
Guru Purnima 2022 Marathi: आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा गुरु पौर्णिमा (Guru Purnima ) म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार चार वेदांचे ज्ञान देणारे महर्षी वेद व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता. यादिवशी व्यासपूजा केली जाते . आषाढ़ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी पाच भिक्षुंना पहिला धर्मोपदेश दिला ती पौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे. आषाढ पौर्णिमा कंबोडिया,थायलंड,श्रीलंका,लाओस,म्यानमार आणि वेगवेगळ्या देशामंध्ये साजरी केली जाते.
गुरुपोर्णिमे दिवशी काय करतात ?
व्यासपूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणा-या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते.शाळा, महाविद्यालयातले शिक्षक, आध्यात्मिक गुरू , कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. विदयार्थी आपल्या शिक्षकानं भेटून शुभेच्छ देतात .