ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Happy Birthday Dalai Lama : दलाई लामा यांच्या विषयी काही खास माहिती !

दलाई लामा माहिती मराठी
दलाई लामा माहिती मराठी

Happy Birthday Dalai Lama: आज दलाई लामांचा (Dalai Lama) वाढदिवस आहे. दलाई लामा 6 दशकांपासून भारतात राहत आहेत आणि स्वत: ला भारताचा पुत्र मानतात. दरवर्षी हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) धर्मशाला येथील तिबेटी समुदायाबरोबर ते वाढदिवस साजरा करतात .

दलाई लामा माहिती मराठी (Dalai Lama Information Marathi)

दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते असतात. ‘दलाई लामा‘ याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. आतापर्यंत १३ दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे चौदावे दलाई लामा हे तेन्झिन ग्यात्सो आहेत.

त्यांचे आई-वडील शेतकरी होते. त्यांच्याकडे असलेल्या शेती व गाई, म्हशींवर ते आपला उदरनिर्वाह चालवायचे. हे कुटुंब इ.स. १९३९ मध्ये दलाई लामांच्या चौथ्या वाढदिवसानंतर आपले छोटसे खेडेगाव सोडून ल्हासा येथे आले.

दलाई लामांच्या निवडीसाठी असलेल्या विविध कसोट्या यशस्वीरीत्या पार केल्यावर फेब्रुवारी २२, इ.स. १९४० रोजी पो ताला प्रासादात एका विधिपूर्व समारंभात तेंझिन गियात्सो चौदावे दलाई लामा म्हणून आसनस्थ झाले. त्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. पुढे त्यांचा धर्मविषयक सखोल अभ्यास सुरू असताना इ.स. १९५० मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले. आणि हा प्रदेश चीनचा भाग असल्याचे घोषित केले. त्याचवेळी तिबेटच्या राजकीय सत्तेची सर्व सूत्रे दलाई लामांच्या हातात आली. या काळात तिबेटवर चिनी राजवटीचा अनियंत्रित अंमल सुरू झाला . धाक, दडपशाही, जुलूम, जबरदस्ती, छळवणूक, पिळवणूक इत्यादी अत्याचार तिबेटच्या जनतेवर चिनी राज्यकर्तांकडून व लष्कराकडून होत होते. भगवान गौतम बुद्धाच्या शांतताप्रिय देशात हिंसाचार, लाठीमार अश्रुधूर व गोळीबार या अत्याचारांनी परिसीमा गाठली. जनतेच्या सर्वप्रकारच्या स्वातंत्र्यावर र्निर्बंध लादले गेले. तिबेटीय कला, संस्कृती व परंपरा यांचा ऱ्हास केला गेला.

चीनच्या वाढत्या जाचामुळे व अत्याचारामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दलाई लामांना त्याच्या कुटुंबीयांसह इ.स. १९५९ मध्ये तिबेट सोडावे लागले. ते भारतात शरण आले. काही लोक नेपाळ, भूतान व इतरत्र शरण गेले. जवाहरलाल नेहरू आणि लामा यांची इ.स. १९५९ मध्ये मसूरी येथे भेट झाली. आज जगभरातील विविध देशांमध्ये तिबेटीय माणसे निर्वासितांचं आयुष्य कंठत आहे. त्यातील बहुतांश मात्र भारतात आहेत. हिमाचल प्रदेशातील धरमशालात दलाई लामा वास्तव्यास आहेत. येथे त्यांनी लोकशाही मूल्यांच्या तत्त्वावर तिबेटीय निर्वासितांची संसद स्थापन केली आहे. आज ही संसद किंवा निर्वासितांचे सरकार दलाई लामांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !