ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

तू मला आवडतेस, मला फोन कर ! अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्यास कर्जत पोलिसांकडून जेलची हवा

तालुक्यातील हंडाळवाडी येथील एका मजनुला अल्पवयीन मुलीला त्रास दिल्याकारणास्तव जेरबंद केले आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

karjat : महिला-मुलींना सन्मानाने जगता यावे,त्यांना शाळा महाविद्यालयात, सार्वजनिक ठिकाणी ओळखीच्या-अनोळखी व्यक्तींकडून त्रास होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव अधिक संवेदनशील आहेत.त्रास देणाऱ्या अनेक रोडरोमियो,मजणुंना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अद्दल घडवली आहे.

प्रसंगी गुन्हे दाखल करून त्यांना जेरबंद केले आहे.आता पुन्हा एकदा तालुक्यातील हंडाळवाडी येथील एका मजनुला अल्पवयीन मुलीला त्रास दिल्याकारणास्तव जेरबंद केले आहे. बाबा भास्कर भिसे, राहणार हंडाळवाडी तालुका कर्जत (वय-२५) असे या त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव आहे.मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर त्याच्यावर भा.द.वी. कलम ३५४ विनयभंगाचा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कर्जत पोलिसांनी त्याला जेलची हवा दाखवली आहे. त्यास किमान 2 महिने जेलची हवा खावी लागणार आहे. याअगोदरही त्याने अनेक मुलींना त्रास दिल्याची,जाळ्यात ओढल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी,’

 

प्राजक्ता (बदललेले नाव) ही कर्जत येथील एका शाळेत शिकत आहे.ती शिक्षणासाठी रोज घरापासून शाळेपर्यंत एसटी बसने येते. दि.८ रोजी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. दुपारी ४ वाजता शाळा सुटल्यानंतर ती घराकडे येण्यासाठी बसस्थानकावर येऊन थांबली होती.त्यावेळी बसस्थानकात थांबलेला व त्याच्या अंगात निळा शर्ट व जीन्स पॅन्ट असलेला अनोळखी मुलगा दुचाकी घेऊन (एम.एच १६ सी.एस २६८८) प्राजक्ताच्या जवळ आला व त्याने तिच्याजवळ असलेली दप्तराची बॅग ओढून तिच्या हाताला पकडून चिट्ठी देण्याचा प्रयत्न केला. ‘तू मला आवडतेस, मला फोन कर’ असे बोलून अश्लील हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.हा प्रकार घडत असताना शेजारी असलेल्या मुलामुलींनी गाडीचे व त्या मुलाचे फोटो काढले होते. सदरचा प्रकार सदर ठिकाणी हजर असलेल्या विद्यार्थिनींनी कर्जत पोलिसांना कळविला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, दीपक कोल्हे, ईश्वर माने यांनी तत्काळ स्थानक गाठले आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना विचारपूस केली त्यावेळी असे लक्षात आले की सदर ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी सदर मुलाचे फोटो व त्याच्या गाडीचे फोटो काढले होते. त्याचा परिसरात शोध घेतला मिळून आला नाही. घरी आल्यानंतर प्राजक्ताने सर्व प्रकार वडिलांना सांगितला.

काय खड्डे काय कर्जत … सगळं कसं ओकेच ! दरम्यान कर्जत पोलिसांनी मुलाचा व गाडीचा शोध घेतला असता त्याचे नाव बाबा भास्कर भिसे, राहणार हंडाळवाडी तालुका कर्जत असल्याचे समजले.घडलेल्या घटनेबाबत कर्जत पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या आदेशाने आरोपीला पोलीस अधिकारी अनंत सालगुडे पोलीस जवान गोवर्धन कदम श्याम जाधव सुनील खैरे यांनी तात्काळ अटकही केली आहे.त्यामुळे रोडरोमियो व त्रास देणाऱ्यांसाठी हा मोठा ‘जोर का झटका’ असल्याचे दिसते.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ आनंद सालगुडे पोलीस जवान गोवर्धन कदम मनोज लातूरकर श्याम जाधव ईश्वर माने दीपक कोल्हे ईश्वर नरोटे आदींनी केली आहे.


 


त्रासाबाबत मुलींनी निर्भयपणे कर्जत पोलिसांना कळवावे. संबंधित तक्रारदाराचे नाव गुप्त ठेऊन कारवाई केली जाते.मुलींची भीती कमी व्हावी यासाठी शाळा महाविद्यालयात अनेक जनजागृती शिबिरे घेतली आहेत.त्यामध्ये मोबाईल क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरीही असे प्रकार घडताना कुणाच्या निदर्शनास आले तर त्रास देणाऱ्याची माहिती तसेच शक्य असल्यास त्याचे व वाहनांचे फोटो पोलिसांना पाठवा.
-चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !