ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

International Chess Day 2022 :आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, बुद्धिबळ खेळाचा इतिहास महत्व काय आहे ?

International Chess Day 2022: इतिहासातील सर्वात प्राचीन आणि लोकप्रिय खेळांपैकी एक असणारा, समानता, परस्पर आदर आणि समजूतदारपणा वाढविणाऱ्या बुद्धिबळ खेळाच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन (International Chess Day 2022) 1966 पासून दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो. याच दिवशी आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ (एफआयडीई) ची स्थापना 1924 मध्ये झाली असून हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन (International Chess Day 2022)म्हणून साजरा करण्याची कल्पना युनेस्कोने प्रस्तावित केली होती. यास अधिकृतपणे मान्यता संयुक्त राष्ट्र संघाने 2019 मध्ये दिली.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचा इतिहास (History of International Chess Day)

FIDE च्या जन्माआधी अनेक वर्षांपासून बुद्धिबळ (International Chess Day 2022) खेळला जात आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाचा जन्म भारतातच झाला होता. चतुरंग हे बुद्धिबळाचंच प्राथमिक रूप. बुद्धिबळांचा शोध साधारणपणे गुप्ता काळात झाला. त्यावेळी त्याचे नाव चतुरंग असे ठेवलेले होते. हा काळातील सर्वात जुना खेळ आहे यात काही शंका नाही. नंतर हा खेळ पर्शियात पसरला. अरबांनी पर्शियावर विजय मिळवला तेव्हा बुद्धिबळ (International Chess Day 2022)हा मुस्लिम लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आणि तेथून तो दक्षिण युरोपमध्ये पसरला. युरोपमध्ये बुद्धिबळ सध्याच्या स्वरूपात विकसित झाले. आणि नंतर त्याला आधुनिक खेळाचे रूप मिळाले.International Chess Day 2022

Leave A Reply

Your email address will not be published.