ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

कर्जत तालुका माहिती (Karjat Taluka Information in Marathi )

Karjat Taluka Information in Marathi: कर्जत हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यातील विविध माहिती आपण जाणून घेणार आहोत  .कर्जत तालुका संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पोस्ट संपूर्ण वाचा,कर्जत तालुका अहमदनगर जिल्हा हे एक ऐतिहासिक तालुका आहे . कर्जत ला धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते . दरवर्षी कामिका एकादशीला इथे मोठी रथयात्रा भरते .

श्री गोदड महाराज हे कर्जतचे ग्रामदैवत आहें, महाराजांचे प्रशस्त मंदिर आहें, आषाढ़ एकादशी (कामिका) रोजी महाराजांची यांत्रा भरते, यात्रे दिवसी गावातुन रथाची मिरवणुक निघते दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा हंगामा भरतो, महाराष्ट्रासह परराज्यातुनही अनेक पैवलान व वस्ताद येतात.

अलीकडच्या काळात कर्जत शहराची ओळख शिक्षण पंढरी अशी होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या काळात कर्जतच्या भूमिपुत्र दादा पाटील यांच्या सहकार्याने येथे रयत शिक्षण संस्थेचे मोठे शिक्षण संकुल उभे राहिले. आज रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व दादा पाटील महाविद्यालय आज हा वारसा पुढे चालवत आहेत. दादा पाटील महाविद्यालयाच्या NCC विभागाने अनेक उच्चांक स्थापित केले आहेत. शहरात अमरनाथ विद्यालय व समर्थ विद्यालय ही शैक्षणिक संकुले देखील कर्जतच्या शिक्षण संस्कृतीमध्ये मोलाची भर घालताना दिसून येत आहेत.

 

Karjat Rathytara 2022 : कर्जत रथयात्रा कधी आहे ? जाणून घ्या ! ‘संत गोदड महाराज रथयात्रा’ महत्व ,इतिहास आणि मान्यता

कर्जत तालुक्यातील पर्यटनस्थळे 

कर्जत तालुक्यातील देवीचे गाव म्हणून ओळखले जाणारे राशीन 

ऐतिहासिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान तसेच राशीन नगरीच्या सांस्कृतिक, वैभवशाली वारशाचे आणि वास्तूश्रीमंतीचे सुंदर प्रतीक म्हणजे “श्री जगदंबा मंदिर राशींन ”  होय. या मंदिराच्या बांधकामात राष्ट्रकूट, चालुक्य, मोगल, मराठा, पेशवे अशा विविध राजवटीतील वास्तुकलेचा उत्कृष्ट संगम आढळून येतो.  या मंदिरातील हलत्या दीपमाळा या इतिहासकालीन वास्तुकलेची अभूतपूर्व निर्मिती म्हणून सर्वत्र विशेष प्रसिद्ध आहेत. श्री तुकाई देवीचे मूळ स्थान तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानीचे मानले जाते.

सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक

सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक

सिद्धटेक सिद्धिविनायक मंदिर  हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे . हे मंदिर  अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे .सिद्धिविनायक मंदिर हे भीमा नदीच्या तीरावर आहे, तसेच हे मंदिर पुणे-अहमदनगर या जिल्ह्यच्या सीमेवर आहे . इथे भरपूर असे निसर्ग सौंदर्य आहे तसेच नदीत बोटिंग ची देखील सुविधा आहे.

सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक

 

रेहेकुरी अभयारण्य हे नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेले अभयारण्य आहे. ते आकारमानाने अतिशय लहान (२.५ चौ.किमी) असून खास काळवीट हरणांच्या संरक्षणासाठी घोषित केले आहे. येथील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारात येते. महाराष्ट्रतील काळवीट हा हरणाचा प्रकार त्याच्या नागमोडी आणि सुंदर शिंगांसाठी इतर हरणापेक्षा वेगळा उठून दिसतो. नर याच शिंगांद्वारे मादीला आकर्षित करून घेतो. मागील काही दवसात येथील विडिओ हरणाचे सोशल मोडियावर व्हायरल होत आहेत .पाहण्यासाठी चान्गले ठिकाण आहे .

जामखेड तालुक्यातील पाहण्यासारखी ठिकाणे – Tourist Places In Jamkhed

 

कर्जत तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालये

  1. Dada Patil College Karjat – दादा पाटील महाविद्यलाय तालुकयातील महत्वाचे आणि प्रसिद्ध महाविद्यलाय आहे येथील dada patil college karjat ncc चे नाव राज्यात नाही तर देशात प्रसिद्ध आहे .
  2. महात्मा गाँधी प्राइमरी, सेकंडरी, हाईयर सेकंडरी & टेक्निकल विद्यालय ऑफ़ कर्जत, अहमदनगर-
  3. shri amarnath vidyalaya karjat
  4. अमरनाथ विदयालय कर्जत
Leave A Reply

Your email address will not be published.