ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Narali Purnima 2022 date : जाणून घ्या कधी आहे नारळी पौर्णिमा , नारळी पौर्णिमा महत्व माहिती आणि इतिहास !

नारळी पौर्णिमा महत्व माहिती आणि इतिहास !
नारळी पौर्णिमा (Narali Purnima 2022)

Narali Purnima 2022 : नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्रातील, विशेष करून  मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील हिंदू कोळी बांधवांकडून साजरा केला जाणारा सण आहे  . कोळी बांधव नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी  साजरा करतात यावर्षी नारळी पौर्णिमा हा सण १२ ऑगस्ट २०२२ रोजी साजरा केला जाईल .

नारळी पौर्णिमा माहिती मराठी

समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरा करतात , कोळी बांधव आपला पारंपरिक वेश परिधान करतात , कमरेला रुमाल व अंगात टीशर्ट आणि डोक्यला टोपी आणि स्त्रिया भरजरी लुगडे परिधान करून समुद्राची नारळ फुले वाहून पूजा केली जाते.

पावसाळा सुरु झाला कि, मासेमारी करणे थांबवले जाते. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळया काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे नौका सुरक्षित रहाव्यात. कोळी बांधव या दिवशी समुद्र शांत होण्यासाठी समुद्राची पूजा करतात. समुद्राला नारळ अर्पण करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.