ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

बघा काय झालीय,कर्जत बसस्थानकाची अवस्था !


कर्जत येथील बसस्थानकामध्ये सध्या समस्यांचा पाऊस सुरू झाला आहे . कुठे रस्ताच गायब झाला आहे , तर कुठे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे . या चिखलातून चालने तर दूर , गाडी चालविणेही अवघड ठरत आहेत . अडचणीचे बसस्थाकांमधील या समस्यांना शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून , ऐन पावसाळ्यात ही परवड सुरू झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत . स्वच्छतागृहातील दुर्गंधी पसरत असते . या कडे एसटी प्रशासनाने लक्ष घालून स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. , अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे .


कर्जत मधील बसस्थानक आवारात चिखलाचे साम्राज्य पसरले असून बसस्थानकाच्या निम्म्या आवाराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे . कित्येक वर्षे याबाबत मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे . प्रवाशांना मात्र मोठी कसरत करून बसमध्ये बसावे लागत आहे . खड्यांतून गाडी जाताना प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे .


बसस्थानक परिसराचे सिमेंट काँक्रिटीकरण व्हावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून मागणी होत असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे . गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने कर्जत बसस्थानकाची दयनिय अवस्था झालेली पाहावयास मिळत आहे . संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच पाणी साठल्याने तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे .स्थानकातीत इतर गैरसोयींनी प्रवासी वर्ग त्रस्त झालेला असतानाच आता स्थानकात येऊन बसमध्ये बसण्यासाठीही चिखल व पाण्याच्या डबक्यातून वाट काढत बसमध्ये बसावे लागत आहे . गाड्या फलाटावर लागताना खड्डे व चिखलातून येत असल्याने प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे .

संपूर्ण स्थानकात डबकी व चिखल पसरला आहे . वयोवृद्ध नागरिक घसरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत . विद्यार्थ्याचा गणवेश खराब होत आहे .चिखलमय रस्त्यावरून येजा करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे . प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने बसस्थानकातील काँक्रिटीकरणाचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. बसस्थानक परिसरातील . हे काम तातडीने मार्गी लावून प्रवाशांची परवड थांबवावी , अशी मागणी होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !