
कर्जत / प्रतिनिधी – :महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अभिनंदन करत समाजाच्या वतीने जाहीर समर्थन देत असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.
लष्कर यांनी शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी वडार महाराष्ट्राचा या वडार समाजाच्या संघटनेच्या वतीने आपणास ग्वाही देतो की, आम्ही सर्व समाज बांधव समाजाचे नेते श्री. विजयदादा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून त्यांना मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते व समाजा बांधव आपल्यासोबत आहोत. तसेच आम्ही आपण घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करतो. तसेच आपण आमच्या समाजाला भविष्यात नक्की योग्य तो न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे लष्कर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच हिंदुत्वाच्या भल्यासाठी आपण योग्य पाऊल उचलले असून आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत. आपली विचारधारा आम्ही मानत असून अहमदनगर जिल्हा मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेकडून आपणास जाहीर समर्थन देत आहोत असे लष्कर यांनी म्हटले आहे.