ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

New Voter Registration: १७ वय पूर्ण झालंय , आताच करता येणार मतदार यादीत नावनोंदणी , जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

New voter registration : 17 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना आता त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी (To register the name in the electoral roll) अगोदरच  नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .त्यासाठी त्यांना 1 जानेवारी  रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण असण्याच्या पात्रतेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.  

मुख्य निवडणूक आयुक्त  राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचे   मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना यासंदर्भातील  निर्देश दिले आहेत. युवकांना, त्यांचे नाव नोंदणीचे  अर्ज एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर या पात्रता तारखांच्या कालावधीत दाखल करता यावेत, त्यासाठी त्यांना  एक जानेवारीची प्रतीक्षा करायला लागू नये यादृष्टीने  तंत्रज्ञानावर आधारित आवश्यक  उपाय योजावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.

वर्षातून चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी !

यापुढे दर तिमाहीत मतदारयाद्या अद्ययावत केल्या जातील. त्यामुळे पात्र  युवक-युवतींची नाव नोंदणी त्या वर्षाच्या पुढील तिमाहीत केली जाऊ शकते ज्यामध्ये त्याने/तिने 18 वर्षे पात्रता पूर्ण केली आहे.नाव नोंदणी केल्यानंतर त्याला / तिला एक मतदार ओळखपत्र दिले जाईल. 2023च्या मतदार यादीच्या वार्षिक पुनरिक्षणाच्या सध्याच्या फेरीसाठी, एक  एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर 2023 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार यादीचे प्रारूप प्रकाशन प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून मतदार म्हणून नोंदणीसाठी आगाऊ अर्ज सादर करू शकतो.

इलेक्ट्रॉनिक मतदार ओळखपत्र – आधार जोडणी

मतदार यादीतील माहिती आणि मतदाराचा आधार क्रमांक लिंक करण्यासाठी, सुधारित नोंदणी अर्जात  मतदारांच्या  आधार कार्डाचे  तपशील नमूद करण्यासाठी माहिती विचारण्यात आली आहे.  तसेच सध्याच्या  मतदारांचा आधार क्रमांक कळावा या उद्देशाने  6बी हा  एक नवीन अर्ज  देखील सादर करण्यात आला आहे. मात्र आधार क्रमांक सादर करणे अशक्य झाल्यास किंवा तशी माहिती पुरवण्यास असमर्थ ठरलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार नाहीत किंवा आधार क्रमांकाअभावी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीचा  कोणताही अर्ज नाकारला जाणार नाही.

31 Comments
  1. EdgarDum says
  2. SueHirty says
  3. JamesHow says

    treatments for ed anti fungal pills without prescription

  4. TommyRat says
Leave A Reply

Your email address will not be published.