गुरुपौर्णिमा निमित्त ,आई वडिलांना पत्रलेखन !

प्रिय- आई बाबा
साष्टांग नमस्कार.
गुरुर्ब्रम्हा गुरुविष्णु: गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरु: साक्षात् परब्रम्ह तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
आई- बाबा तुम्हाला गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! आई-बाबा प्रत्येकाच्या आयुष्यात तीन महत्वाचे गुरू असतात. आई, वडील व शिक्षक,आई माझा गुरू माझे जग तुझ्यापासूनी सुरू तुम्ही दोघं माझ्या आयुष्यातत्ये सर्वांत मोठे व सर्वांत जास्त महत्त्वाचे गुरू आहात. तुमच्यामुळेच आज मी हे जग पाहू शकले आहे. तुम्ही मला चालायला, बोलायच्या शिकवलत. माझ्या प्रत्येक स्वासावर तुमचा अधिकार आहे. ‘आई-बाबा ‘हे दोन शब्द म्हणजे माझे जीवन आहे. अगदी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत तुम्ही मला जे हवं नको ते सगळ दिल. तुम्ही माझ्यासाठी देवासमान नव्हे, तर देवाहून प्रिय आहात. तुमच्या चरणात स्वर्गाहून सुंदर ठिकाण आहे. हया संपूर्ण विश्वावर तुमची जागा कुणी च नाही घेऊ शकत.
तुम्हीमला आपण आपली जबाबदारी कशी पार पाडावी. कोणत्या प्रसंगी काय | वर्तवणूक करावी हे ही शिकवलत. माणुसकी च दर्शन मला घडवतात. माझी कविता करण्याचा छंद जोपासायला मला प्रोत्साहान दिलं.
तुमचा स्वभाव खूप छान आहे. तुम्ही एखादी गोष्ट अतिशय उत्तम पदधतीने मला समजावून सांगता. आणि म्हणूनच तुम्ही दोघ माझा आदर्श आहात. मला तुमचा अभिमान आहे.
आई बाबा तुम्ही माझे आराध्यदैवत आहात.
आग्रा येथील ताजमहाल चे फोटो !
गुरुपौर्णिमा माहिती ,महत्त्व आणि इतिहास , जाणून घ्या ! गुरुपौर्णिमा कधी आहे ?