ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

PM Kisan Yojana: शेतकरी मित्रांनो; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, त्वरित करा हे एक काम

EKYC प्रक्रिया जाणून घ्या

मुंबई : केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना (farmers) आर्थिक दिलासा मिळेल. यामधीलच एक योजना म्हणजे पीएम किसान योजना. तुम्ही पीएम किसान योजनेचे (Pm kisan scheme) लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

शेतकरी मित्रांनो, तुम्‍ही आत्तापर्यंत या योजनेंतर्गत EKYC केले नसेल, तर ते तात्काळ करा. तुम्‍ही केवायसी (EKYC) केले नाही तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला आर्थिक झळ सोसावी लागू शकते.

केंद्र सरकारने (central government) योजनेचा लाभ मिळवण्यासाठी eKYC ची मुदत वाढवली होती. ही माहिती पीएम किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in) देण्यात आली आहे. PMKISAN लाभार्थ्यांसाठी eKYC ची अंतिम मुदत 31 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे त्याची अंतिम मुदत जवळ आली असल्याने शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे.

EKYC प्रक्रिया जाणून घ्या –

1) आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील ‘EKYC’ पर्यायावर क्लिक करा.
2) बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल.
3) तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने ते घरी बसून पूर्ण करू शकता.
4) यासाठी प्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
5) उजव्या बाजूला तुम्हाला असे टॅब आढळतील. सर्वात वर तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करा.

Leave A Reply

Your email address will not be published.