ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

प्रा. डी. एस. कुंभार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी .एच . डी. (डॉक्टरेट) पदवी

कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. दिग्विजय श्रीपती कुंभार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच पी .एच . डी. (डॉक्टरेट) प्रदान केली. ते प्राणिशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘स्टडीज ऑन हैड्रोबायॉलॉजि , एवीयण बायोडायव्हर्सिटी अँड हेरोनरी साईट्स ऍट उजनी रीजरवायर, महाराष्ट्र ‘ या विषयावर तब्बल पाच वर्षे अभ्यास करून पुणे विद्यापीठास प्रबंध सादर केला होता, त्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मान्यता देऊन दि. २३/०६/२०२२ रोजी पी .एच. डी. (डॉक्टरेट) प्रदान केली. त्यांना संशोधन मार्गदर्शक प्राचार्य डॉ. डी. के. म्हस्के यांचे मार्गदर्शन तसेच दादा पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ . बाळ कांबळे व प्र. प्राचार्य डॉ. संजय नगरकर, संशोधन केंद्रप्रमुख प्रा डॉ. बी. ए. पवार , प्राचार्य डॉ. पी. एम. दिघे यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !