ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

श्रावण महिना माहिती मराठी – shravan mahina 2022 marathi

Shravan month information in Marathi: श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. या श्रावण महिन्याची माहिती आपण पाहणार आहोत .

यावर्षी श्रावण महिना २७ जुलै रोजी सुरु होत आहे . श्रावणाला हिंदीत सावन म्हणतात, संस्कृतमध्ये श्रावण आणि नभ(स्) असे कमीतकमी दोन शब्द आहेत.श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते.श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्याना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैनधर्मीयांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.

श्रावण महिन्यातील सण ,श्रावण महिन्यातील सणांची माहिती

श्रावण महिन्यात पुढील सण उत्सव असतात .

 • श्रावण शुद्ध पंचमी
 • नागपंचमी
 • कल्की जयंती
 • नरहरी सोनार जयंती.
 • रक्षाबंधन
 • नारळी पौर्णिमा
 • श्रावण वद्य अष्टमी- श्रीकृष्ण जयंती/’कृष्ण जन्माष्टमी’
 • पिठोरी अमावास्या पोळा

श्रावण महिन्यात करण्यात येणारी व्रते

 • सोमवार- श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे.
 • नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात.
 • बुधाची पूजा
 • बृहस्पती पूजा
 • जिवती देवीचे पूजन, पुरणाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे.
 • ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन
 • आदित्य राणूबाई पूजन
 • सत्यनारायण पूजा

ITBP SI Recruitment 2022: आयटीबीपी सब इन्स्पेक्टर भरती ,14 जुलैपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात ,जाणून घ्या अधिक माहिती !
12 वी उत्तीर्ण महिलांसाठी सरकारी नोकऱ्या 2022 (12th pass govt job for female 2022 )

 

श्रावण महिन्याचे वर्णन

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा २३ जुले ते २२ ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो

 

Leave A Reply

Your email address will not be published.