आषाढी एकादशी,निमित खास मराठी कविता | Special Marathi Poem for Ashadi Ekadashi

जय जय राम कृष्ण हरी!!
आली आली हो आषाडी
झटपत ऊठा ऊठा हो वारकरी
डोळे भरूनी विठूला पाहूया.
पंढरपुरच्या वारीला जाऊया
वीठू माझा सावळा, साधा भोळा
त्याच्या भोवती आहे प्रेमळ भावनांचा गोतावळा
डोईवर तुळस हाती मृदुंग आणी ताळ
नाचत गाजत विठ्ठल नामात दंग होऊया
चला चला पंढरापुरच्या वारीला जाऊ या.
वीठू माझा कांतीने सावळा
त्याच्या डोळयात चमचमनारा काजवा
त्याच्या तेजात न्हाऊन जाऊ या
विठ्ठल नामाचा गजर करू या.
चला चला हा पंढरपुरच्या वारीला जाऊया
विठू आहे माझा बाप
माय रुखमाई माऊली
आपले सुख दुख अर्पण करूया
त्यांच्या चरणी लीन होऊ या
चला चला हो पंढरपुरच्या वारीला जाऊया
डोळे भरूनी वीठ्ठलाला पाहूया
सुंदर तेश ध्यान, ऊभे विटेवरी | करकटावरी ठेवूनीया||
तुळसीहार गळा कासे पीतांबर| आवडे निरंतर हेही रुप||
मकरकुंडले तळपती श्रवणी| कंठी कौस्तुभमणी विराजीता।
तुका म्हणे माझे हेची सर्व मुख | पाहीन श्रीमुख आवडीने
जय जय राम कृष्ण हरि ||
विठ्ठल | विठ्ठल |