ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

ताडपत्री अनुदान योजना ; ताडपत्री अनुदान योजना काय आहे ? या योजनेचं लाभ कसा घ्यायचा ?

ताडपत्री अनुदान योजना काय आहे ? या योजनेचं लाभ कसा घ्यायचा ?
ताडपत्री अनुदान योजना

Tarpaulin Subsidy Scheme :  शेतकऱयांना 50% अनुदानावर पिक संरक्षण औजारे/औषधे, सुधारित कृषि औजारे, कडबाकुट्टी यंत्र, प्लास्टिक क्रेटस्, डिझेल/पेट्रोकेरोसिन स्प्रेपंप /विद्युत मोटार, पंपसंच, पीव्हीसी पाईप व ताडपत्री इ. औजारे पुरवठा या योजने अंतर्गत अनुदान दिले जाते जाणून घेऊयात नेमकी काय असते हि योजना !

या योजनेचा लाभ घेण्यासाठी  शेतकऱ्यांच्या नावावर  शेत जमीन असणे गरजेचे असते . शेतकरी अल्प / अत्यल्प भू-धारक/ महिला / मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी  निवडले जातात.

आवश्यक कागदपत्रे:-

 • संबंधीत तालुक्याच्या गट विकास अधिकारी यांचेकडे अर्ज करावा.
 • जमीन धारणेचा 7/12 किंवा 8 अ चा उतारा.
 • कडबाकुट्टी यंत्र व विद्युत मोटार यासाठी वीजबील झेरॉक्स प्रत आवश्यक.

शेतकर्याने गट विकास अधिकारी यांचेकडे कागदपत्रासह अर्ज करावा. कागदपत्रांची तालुका पातळीवर छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकार्याकमार्फत कृषि विकास अधिकारी यांना सादर केली जाते. सदर यादी कृषि विषय समिती सभेमध्ये मंजूरी घेवून कृषि निविष्ठा/औजारे दर करार पत्रकानुसार एम ए आय डी सी / एम एस एस आय डी सी / डी एम ओ पुरवठादार संस्थेना पुरवठा आदेश देवून कृषि निविष्ठा/औजारे गट पातळीवर पुरवठा केला जातो.

1 योजनेत काय मिळते ?

 • 1) ताडपत्री
 • 2) पीव्हीसी पाईप
 • 3) किटक व बुरशीनाशक औषधे
 • 4) डिझेल/पेट्रोकेरोसीन/विद्युत मोटार पंपसंच
 • 5) नॅपसॅक /एचटीपी/पॉवर स्प्रे पंप
 • 6) इलेक्ट्रीक कडबाकुट्टी यंत्र
 • 7) सायकल कोळपे
 • 8) 51, 9 व 6 इंची नांगर
 • 9) सारायंत्र.
 • 10) प्लॉस्टिक क्रेटर्स
 • 11) सुधारित विळे
Leave A Reply

Your email address will not be published.