ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

काय खड्डे काय कर्जत … सगळं कसं ओकेच ! 

रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डेच खड्डे पडून रस्ते होत्याचे नव्हते झाले आहेत . ही परिस्थिती पाहता नागरिकांच्या तोंडातून एकच वाक्य निघते आहे काय रस्ते , काय खड्डे काय कर्जत … सगळं कसं ओकेच !

Karjat:  शहरात दोन तीन दिवसांपासून संततधार चालू आहे . त्यामुळे कर्जत शहरातून जाणाऱ्य बहुतांश लहान – मोठ्या रस्त्यांवरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे .

Karjat
Karjat

काही ठिकाणी खड्ड्यांत पाणी साचून तळी तयार झाल्याचे दिसत आहे . यातून वाट काढणे नागरिकांना कठीण होत आहे . मे महिन्यांपूर्वीच प्रशासनाकडून कर्जत राशीन — मिरजगाव या महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते . मात्र , पहिल्याच पावसात रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डेच खड्डे पडून रस्ते होत्याचे नव्हते झाले आहेत . ही परिस्थिती पाहता नागरिकांच्या तोंडातून एकच वाक्य निघते आहे काय रस्ते , काय खड्डे काय कर्जत … सगळं कसं ओकेच !

Karjat
Karjat

दळणवळणाच्या व नित्य वर्दळीच्या कर्जत -राशीन – मिरजगाव रस्त्यावर खड्डे की खस्ता असा यक्ष प्रश्न पडतो आहे . नगर रस्ता , श्रीगोंदा रस्ता , करमाळा रस्ता, बस स्थानक चौक, गोदडमहाराज चौक या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून , प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे . पावसाच्या आगमनाने शहरातील या मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून , वाहनचालक , पादचाऱ्यांसह विद्याथ्र्यांना या मार्गावरून वाट काढणे जिकिरीचे झाले आहे . दोन दिवसांपासून सुरू झालेल्या रिपरिप पावसामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांचा त्रास वाढला आहे .

Karjat
Karjat

त्याचबरोबर नालेसफाई व स्वच्छता कामासाठी नगर पंचायत कडे फंड , आमदार , खासदार यांचा निधी येत असतो . परंतु त्या निधीचा योग्य विनियोग केला जात नसल्याचे यावरून दिसत आहे . मुतारी सारखीच अवस्था झालेली आहे . वाहनांची सतत ये जा चालू असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे . पावसाच्या पाण्याचा प्रवाह आणि विसर्ग होण्यासाठी पाहिजे तशा उपाययोजना होत नसल्याचेच यावरून सिद्ध होत आहे . चिखलाचा त्रास वाढला आहे .

Karjat
Karjat

या रस्त्यावर पाय ठेवणे जिकिरीचे झाले आहे . वाहनांचे लहान – सहान अपघात विद्यार्थी व लोकांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडणे , असे प्रकार येथे नित्याचेच झाले आहेत . या रस्त्याचे काँक्रिटीकरण व रुंदीकरण जेव्हा हाईल तेव्हा होईल , मात्र तत्पूर्वी त्यावरील खड्डे तरी बुजवावे , अशी मागणी केली आहे . तोपर्यंत म्हणावें काय , काय रस्ता , काय खडूे काय कर्जत… सगळे कसे ओके !

44 Comments
  1. KimHirty says
  2. Davistot says
  3. DanielShids says

    [url=http://erectiledysfunctionpillsx.online/]ed pills online[/url]
    purchase ed pills online no prescription

  4. JasonHirty says
  5. NickHirty says
Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !