ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

लोकमान्य टिळकांच्या महान विचारांचा सावरकरांच्या विचारांवर प्रभाव पडला होता ?

गुलमांचा बदला चाफेकरांनी जुलमी चा खून करून घेतला आणि स्वतः हसतमुखाने फासावर गेले. या घटनेचा तसेच लोकमान्य टिळकांच्या महाल विचारांचा सावरकरांच्या विचारांवर प्रभाव पडला होता. त्यांनी इ. स. 1900 मध्ये क्रांतिकारकांची मित्रमेळा नावाची संस्था काढली होती. पुढे या संस्थेचे रूपांतर इ. स. 1904 मध्ये ‘अभिनव भारत’ या संस्थेत झाले. या संस्थेने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये क्रांतीची ज्योत तेवत ठेवली, सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळविणे हे या संस्थेचे ध्येय होते. सन 1905 च्या बंगालच्या फाळणीनंतर लोकमान्य टिळकांच्या प्रभावाखाली सावरकरांनी ठिकठिकाणी परदेशी मालाच्या डोळ्या केल्या व स्वदेशीचा जोरदार पुरस्कार केला. पुढे सावरकरांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या सहकायनि इंग्लंडमध्ये इंडिया हाउसची स्थापना केली. इंडिया हाउस म्हणजे तरुण क्रांतिकारकांचे एक प्रमुख केंद्र बनले. अनेक हिंदी तरुणांना सावरकरांनी क्रांतीसाठी तयार केले.

अभिनव भारतचे कार्य सावरकर इंग्लंडमध्ये गेले तरी चालूच होते. इंग्रज सरकारविरुद्ध स्वातंत्र्याभिमान जागृत करण्याचे कार्य सातत्याने सुरू राहिले. सावरकरांचे बंधू गणेश सावरकरांनी स्वातंत्र्यप्रेमाच्या काही कविता प्रसिद्ध केल्याबद्दल नाशिकच्या जॅक्सन या कलेक्टरने जन्मठेपेची शिक्षा दिली. इंग्लंडमध्ये सर विल्यम कर्झन वायली हादेखील इंडिया हाउसवर करडी नजर ठेवून होता. दोन्ही ठिकाणच्या इंग्रज सरकारच्या या वर्तणुकीमुळे अभिनव भारत आणि इंडिया हाउस येथील क्रांतिकारकांनी या अन्यायाचा सूड घेण्याचे ठरविले. इंडिया हाउसमधील तरुण क्रांतिकारक मदनलाल पिंग्रा यांनी जुलै 1902 मध्ये कर्झन वायलीला गोळी घालून ठार केले. डिसेंबर 1909 मध्ये नाशिक येथे अनंत कान्हेरे या तरुणाने जॅक्सनला ठार केले. अशा रीतीने क्रांतिकारकांची चळवळ दडपून टाकणाऱ्या जुलमी अधिकाऱ्यांचा सूड घेण्यात आला.

सावरकर या काळात पॅरिसमध्ये होते. तरीदेखील जॅक्सनच्या खुनाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता, नाशिकच्या सेशन कोर्टात सावरकरांवर खटला चालविण्यात आला. पुढे त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.