World Population Day 2022 : जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ? जाणून घ्या इतिहास आणि या वर्षाची थीम

World Population Day 2022 : लोकसंख्या नियंत्रणाच्या उद्देशाने दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day) साजरा केला जातो. लोकसंख्या नियंत्रण हे आवश्यक पाऊल आहे. हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जाणून घेवूयात जागतिक लोकसंख्या दिन माहिती (world population day information in marathi)
जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. ११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले.
11 जुलै 1987 रोजी जागतिक लोकसंख्या 5 अब्जांवर पोहोचली होती. त्यानंतर 11 जुलै 1989 रोजी संयुक्त राष्ट्रांमध्ये लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी आणि कुटुंब नियोजनाबाबत लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी प्रथमच जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. डिसेंबर 1990 मध्ये ते अधिकृत करण्यात आले. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या वर्षाची थीम
दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन ही थीम घेऊन साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्या दिन 2022 ची थीम ‘8 बिलियनचे जग: सर्वांसाठी एक लवचिक भविष्याकडे – सर्वांसाठी संधींचा उपयोग आणि सर्वांसाठी हक्क आणि निवडी सुनिश्चित करणे’ आहे.