जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day Marathi Information)

World Youth Skills Day Marathi Information: जागतिक युवा कौशल्य दिवस तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व आणि स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित व इतर कौशल्यांच्या विकासाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ जुलै रोजी देशभरात साजरा केला जातो . तरुणांना रोजगार, योग्य काम आणि उद्योजकता या कौशल्यांनी सुसज्ज करणे गरजेचे आहे. या दिवशी वर्तमान आणि भविष्यातील जागतिक आव्हाने सोडविण्यासाठी कुशल तरुणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर देखील प्रकाश टाकला जातो विविध कार्यक्रमंचे आयोजन केले जाते .
जागतिक युवा कौशल्य दिनाचा इतिहास
डिसेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ठराव स्वीकारून १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला गेला होता . आजच्या तरूणांसाठी बेरोजगारी आणि रोजगाराच्या आव्हानांच्या बाबतीत अधिक चांगली सामाजिक-आर्थिक परिस्थिती प्राप्त करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
महत्त्व
२१ व्या शतकातील तरुणांसाठी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. युवा २०२० च्या ग्लोबल एम्प्लॉयमेंट ट्रेंड्सच्या अहवालानुसार २०२० पासून तरुण नोकरी नसलेले किंवा प्रशिक्षित नसलेल्या लोकांची आकडेवारी वाढली आहे.