ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Agricultural Business: शेतकऱ्यांचे अच्छे दिन; ‘या’ फळपिकाच्या लागवडीतून शेतकरी कमवतोय 8 ते 10 लाख रुपये

फणस लागवड माहिती

शेतकरी (farmers) चांगले उत्पादन घेण्यासाठी नवनवीन पिकांचा अवलंब करत असतात. मात्र अनेक शेतकऱ्यांना अशी पिके माहीत नसतात ज्यातून त्यांना चांगले उत्पादन मिळेल. आपण आज अशाच फळशेतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

फणस (Fanas) म्हणजेच जॅकफ्रूटची मागणी (Demand for jackfruit) सर्वात जास्त होत आहे. हे फळ खाण्यासह त्याची भाजी देखील केली जाते. अनेक शेतकऱ्यांनी फणस लागवडीचा यशस्वी प्रयोग करुन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु  फणसाची योग्य लागवड केली तर शेतकरी (farmers) लाखोंमध्ये उत्पन्न घेऊ शकतात. योग्य लागवड कशी करावी? याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

फणसाची लागवड कशी करावी ?

1) फणसाची म्हणजेच जॅकफ्रूटची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते, परंतु वालुकामय चिकणमाती त्याच्या पिकासाठी अतिशय योग्य मानली जाते.

2) तुम्हाला जमीन जलमय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तिच्या लागवडीतील जमिनीचा पीएच मूल्य सुमारे ७ असावे.

3) जून ते सप्टेंबर महिन्यात फणसाची लागवड करता येते. उष्ण व दमट हवामान हे फणसाच्या पिकासाठी योग्य मानले जाते.

4) त्याची रोपे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सहज वाढतात, परंतु थंडीत पडणारे दंव त्याच्या पिकासाठी हानिकारक असते.

5) यासोबतच १० अंशांपेक्षा कमी तापमान झाडांच्या वाढीसाठी हानिकारक आहे. फणसाचे रोप तयार झाले की ते अनेक वर्षे उत्पादन देते.

6) जर फणसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली तर शेतकर्‍यांना वर्षाला ८ ते १० लाखांचा नफा सहज मिळू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.