ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

अहमदनगर: पोलीसदादांना महिलांनी बांधली राखी , रक्षाबंधन साजरे केल्याने अत्यंत आनंद झाल्याची भावना पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.”

AHMEDNAGAR: Women tied rakhi to police officers, police officers and employees expressed their happiness to celebrate Raksha Bandhan.

अहमदनगर : रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण. परंतु रक्षाबंधन असो, वा अन्य कोणताही उत्सव ! पोलिसांना शांतता-सुव्यवस्था सांभाळण्यासाठी आपल्या कामावरच ‘ऑन ड्युटी’ हजर रहावे लागते.त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करता येत नाही.मात्र कर्जतमधील अनेक महिलांनी अचानक पोलीस ठाण्यात येऊन पोलीसदादांना राखीचे बंधन बांधून बहीण-भावाच्या प्रेमाचा आल्हाददायक गारवा दिला.


“कामामुळे अनेकदा आमच्या बहिणींसोबत रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही. आज शहरातील महिला-भगिनींनी आमच्यासोबत रक्षाबंधन साजरे केल्याने आम्हालाही अत्यंत आनंद झाल्याची भावना अनेक पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.”

यावेळी स्वाती पाटील, मनिषा सोनमाळी,शबनम मुंढे, माधुरी कल्याणकर, वैशाली टकले सुनिता घालमे, आश्विनी घेरडे, शिल्पा माळवे, पुष्पा शिंदे, अलका शिंदे, शिफा शेख, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे भगवान शिरसाट, कर्जत पोलीस स्टेशन चे पोलीस जवान व कर्जत शहर व परिसर आणि रवळगाव येथील महिला भगिनी उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे Justin Timberlake: “dit is mijn grootste angst