Crop Insurance Scheme : पीक विमा भरण्यासाठी 15 दिवस मुदतवाढ , लवकर करा हे काम !

Crop Insurance Scheme : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY ) नोंदणी करण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल ( NCIP )हे एकमेव साधन आहे. यामध्ये विविध मान्यताप्राप्त बँका किंवा वित्तीय संस्थांच्या मार्फत प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची नोंदणी होते. शेतकऱ्यांची नावनोंदणी, विम्याच्या हप्त्याची रक्कम अदा करणे, शेतकऱ्यांचा विमा हप्ता संबंधित विमा कंपनीकडे हस्तांतरित करणे, राष्ट्रीय पीक विमा पोर्टल ( एनसीआयपी ) वर शेतकऱ्यांविषयीच्या माहितीची नोंद करणे यासाठी विशिष्ट कट ऑफ तारखा निर्धारित केल्या आहेत.
मात्र निरीक्षणातून असे दिसून आले आहे की काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील बँका किंवा वित्तीय संस्था एनसीआयपी वर माहिती अपलोड करत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर नावनोंदणी करता येत नाही.
असे प्रकार होऊ नयेत यादृष्टीने , शेतकऱ्यांचे प्रस्ताव अथवा अर्ज सादर करण्यासाठी, तसेच एनसीआयपीवर वैयक्तिक शेतकरी-निहाय डेटा नोंदणी आणि विमा हप्त्यावरच्या अनुदानाची रक्कम मोजण्याच्या हेतूने, बँका किंवा वित्तीय संस्थांना कट ऑफ तारखेपासून अतिरिक्त 15 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे.