ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

हैदराबाद: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या मुलीची आत्महत्या , राहत्या घरात संपवले जीवन !

हैदराबाद: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची कन्या कांतमानेनी उमा माहेश्वरी यांनी सोमवारी हैदराबादमधील जुबली हिल्स येथील राहत्या घरी आत्महत्या केली. उमा माहेश्वरी यांना आरोग्याच्या समस्या होत्या आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ती तिच्या बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला आहे. माहेश्वरीच्या मृत्यूची माहिती मिळताच चंद्राबाबू, त्यांचा मुलगा नारा लोकेश आणि इतर कुटुंबीयांनी उमा माहेश्वरी यांच्या घरी धाव घेतली. TDP संस्थापक आणि दिग्गज अभिनेत्याच्या 12 मुलांमध्ये उमा माहेश्वरी सर्वात लहान होत्या. उमा माहेश्वरी यांच्या निधनाने नंदामुरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Leave A Reply

Your email address will not be published.