Har ghar tiranga registration : हर घर तिरंगा प्रमाणपत्र साठी नोंदणी कशी करावी ,हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड

Har Ghar Tiranga Certificate: हर घर तिरंगा अभियानाची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या मोहिमेअंतर्गत देशाच्या पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना घरोघरी तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत माननीय पंतप्रधानांनी ट्विटद्वारे हे आवाहन जनतेला केले आहे. या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि आम्ही ७५ वा ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करणार आहोत. यानिमित्ताने अमृत महोत्सव सुरू करण्यात आला आहे. हा क्षण भारतातील सर्व नागरिकांसाठी खूप खास आहे, म्हणूनच आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी देशातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Har Ghar Tiranga Certificate : हर घर तिरंगा प्रमाणपत्र , डाउनलोड कसे करायचे ?
सर्वात अगोदर आम्ही देत असलेल्या लिंक वर जा https://harghartiranga.com/ इथे आपल्याला खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे दिसेल तिथे पिन अ अ फ्लॅग वरती क्लीक करा .

इथे आता खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे नाव मोबाईल नंबर किंवा गुगल द्वारे लॉगिन करू शकतात . लोकेशन ला परवानगी द्या

आता तुम्हला मॅप वर आपल्या घराचे लोकेशन निवडायचे आहे आणि फ्लॅग पिन करायचा आहे ते तुम्ही करा .
यांनतर आपण आता आपले प्रमाणपत्र (Har Ghar Tiranga Certificate)डाउनलोड करू शकतात .