ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Land Survey Application: मोबाईलवर जमीन कशी मोजावी ; जमीन मोजणी सोपी पद्धत

मोबाईलने शेताचे मोजमाप असे करा

मुंबई: शेतकऱ्यांसाठी (farmers) ही महत्त्वाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना घर बसल्या मोबाईलवरुन कमी श्रमात जमिनीची मोजमाप (Land Survey Application) करता येणार आहेत. आता टेपची किंवा पट्ट्याची गरज भासणार नाही. काही मिनिटात शेट जमीन मोजता येणार आहे.

जमीन मोजण्यासाठी शेतकऱ्यांकडे (farmers) फक्त एक स्मार्टफोन असण्याची गरज आहे, ज्यामध्ये इंटरनेट आणि जीपीएसची सुविधा असेल. शेत किंवा जमिनीचे मोजमाप करण्यासाठी अर्ज करावा लागतो मात्र आता त्यानंतर हे सर्व काम या अँप्लिकेशनद्वारेच (Application) केले जाईल.

हे अँप्लिकेशन आपल्या स्मार्टफोनमध्ये घेण्यासाठी शेतकरी बांधवांना आधी गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) जावे लागेल. यानंतर तुमच्यामध्ये “distance and area measurement” नावाचे अँप्लिकेशन इन्स्टॉल करा. त्यानंतर फोनचा GPS ऑन करून हे अँप्लिकेशन ओपन करा.

मोबाईलने शेताचे मोजमाप असे करा

1) फोनमध्ये “distance and area measurement” नावाचे अँप्लिकेशन उघडल्यानंतर “Distance” , मीटर, फूट, यार्ड इत्यादीसाठी मोजमापांपैकी एक निवडा. जर शेतकरी शेतजमिनीचे मोजमाप करत असतील तर ते Area साठी Acre हा ऑप्शन निवडू शकतात.

2) आता तुम्हाला तळाशी एक स्टार्ट बटण दिसेल, जे दाबून तुम्हाला मोजण्यासाठी जमिनीभोवती पूर्ण फेरी काढावी लागेल. जमिनीच्या कानाकोपऱ्यातून क्षेत्रफळ मोजायचे आहे. त्यामुळे तुमची एक फेरी पूर्ण होताच तुमच्या जमिनीचा पूर्ण आकार कळेल.

3) शेतकऱ्यांनी या अँप्लिकेशनचा वापर केला तर फायद्याचे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.