ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

The Grand Onion Challenge : कांदा काढणी नंतर कांद्याचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी सरकारचे ,ग्रँड ओनियन चॅलेंज अभियान !

The Grand Onion Challenge
The Grand Onion Challenge

The Grand Onion Challenge: काढणी पश्चात कांद्याचे नुकसान कमी करण्यासाठी आयोजित केलेल्या ”ग्रँड ओनियन चॅलेंज” संदर्भात  ग्राहक व्यवहार विभागाने आज शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, कुलगुरू, प्राध्यापक, प्रख्यात संस्थांचे अधिष्ठाता ,वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ, स्टार्टअपचे कार्यकारी , बीएआरसी  मधील शास्त्रज्ञ, अणुऊर्जा विभाग, शिक्षण मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे अधिकारी  आणि कृषी, फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया.क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांसह दूरदृश्य प्रणालीद्वारे एका बैठकीचे आयोजन केले होते

या चॅलेन्जच्या माध्यमातून देशात कांद्याचे  काढणी पूर्व तंत्र , प्राथमिक प्रक्रिया, साठवणूक आणि काढणीनंतर  कांद्याची वाहतूक यात सुधारणा करण्यासाठी,  उत्पादन रचना आणि मूळ नमुना याचा अभ्यास असलेल्या  तरुण व्यावसायिक, प्राध्यापक, वैज्ञानिकांकडून कल्पना  मागवण्यात येत आहेत. निर्जलीकरण, कांद्याचे मूल्यस्थापन आणि कांदा प्रक्रिया क्षेत्रात तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करण्याच्या कल्पनाही  या चॅलेंजच्या माध्यमातून  मागवण्यात येत आहेत.

देशातील सर्वोत्कृष्ट बुद्धिमान लोकांकडून  वर नमूद  केलेल्या सर्व क्षेत्रामधील  कल्पना प्राप्त करण्यासाठी  ग्राहक व्यवहार विभागाद्वारे 20.7.2022-रोजी सुरु करण्यात आलेले ग्रँड ओनियन चॅलेंज 15.10.2022 पर्यंत खुले आहे. या चॅलेंजबाबत अधिक माहिती विभागाच्या doca.gov.in/goi या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.