ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Tulsi farming: शेतकऱ्यांनो, तुळशीची शेती करून कमी गुंतवणूकीत घ्या लाखोंची कमाई

मुंबई: कोरोनाच्या (corona) आजारानंतर आयुर्वेदिक औषधांकडे (Ayurvedic medicines) अनेकांचे लक्ष वेधले आहे. च्यवनप्राश ते घरातील धूप अगरबत्ती तसेच साबणात सुद्धा तुळशीच्या अर्काला विशेष मागणी आहे. अर्थात या साऱ्यामुळे तुळशीची शेती (Cultivation of Tulsi) ही नफ्याचे स्रोत ठरत आहे. सध्या तुळशीचा वापर जास्त आणि पुरवठा कमी असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.

शेतकरी मित्रांनो वैयक्तिक स्तरावर शेती (agriculture) करण्यापेक्षा तुळशीची उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीशी करार करून लागवड (cultivation) केली तर जास्त फायद्याचे ठरेल. तुळशीचा लागवड खर्च प्रति एकर 15 हजार रुपये आहे. तर सरासरी महिन्याला किमान 30 हजार ते लाख रुपयांपर्यंत म्हणजेच तीन महिन्यांत 3 लाख रुपये इतकी मिळकत सहज तुळशीच्या लागवडीतून शक्य आहे.

आज वैद्यनाथ, डाबर, पतंजली या कंपन्या तुळशीच्या लागवडीसाठी बाजारात करार करीत आहेत. कंत्राटी शेतीशिवाय तुम्ही तुमचे पीक मार्केट (crop market) एजंटांनाही विकू शकता. जवळपासच्या बाजारात आपला माल विकण्यासाठी तुम्ही विविध व्यापाऱ्याशी संपर्क साधू शकता. तसेच, कॉन्ट्रॅक्ट शेती (contract agriculture) करणे हा एक चांगला पर्याय आहे.

तुळशीची लागवड (tulasi cultivation) साधारण जुलै महिन्यापासून करणे फायद्याचे ठरते. रोपांवर फुले येण्यास सुरूवात होते त्याचवेळेस कापणी केल्यास रोपांना नवीन फांद्या येतील आणि जास्त तेल काढता येईल. अशावेळी तुम्हाला चांगली मिळकत मिळू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.