ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

काय सांगता! शेतकरी मित्रांनो ‘या’ भाजीपाल्याची करा लागवड; तब्बल विकली जातेय 300 रुपये किलो

कोथिंबीर लागवडीसाठी शेत

मुंबई: शेतकरी (farmers) तीनही हंगामात नवनवीन पिकांची शेती करून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात. भाजीपाला शेतीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन (product) मिळू शकते. मात्र कमी मेहनत आणि जास्त उत्पन्न कोणत्या भाजीपाला शेतीमध्ये मिळते? याची माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते. त्यामुळे आज आपण तब्बल 300 रुपयेला विकली जाणाऱ्या भाजीपाला विषयी आपण जाणून घेणार आहोत.

भाजीपाला वर्गीय पिके (Vegetable class crops) काही महिन्यातच शेतकरी बांधवांना लाखोंचे उत्पन्न मिळवून देत असल्याने शेतकरी आता भाजीपाला लागवडीकडे वळत आहेत. सध्या कोथिंबीर पिकाला बाजारात चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकरी बांधव अल्प4कालावधीतच लाखों रुपयांचे धनी होत आहेत.

नाशिक जिल्ह्यात एका शेतकऱ्याला अवघ्या तीन ते चार एकर क्षेत्रावर असलेल्या कोथिंबीर पिकातून तब्बल साडे अकरा लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या कोथिंबीर पीक लागवडीकडे (Coriander Farming) शेतकऱ्यांचा कल वळत आहे. त्यामुळे आज आपण कोथिंबिरीची योग्य लागवड जाणून घेणार आहोत.

कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी ? कोथिंबीर किती दिवसात येते ?

1) कोथिंबीर लागवड करण्यासाठी शेताची योग्य नांगरणी केल्यानंतर योग्य प्रमाणात डीएपी आणि पोटॅशचा वापर करून रोटाव्हेटरने शेताची नांगरणी करून माती बारीक केली पाहिजे.

2) यानंतर शेतकरी बांधवांनी कोथिंबीर पिकाची पेरणी केली पाहिजे. यासाठी शेतकरी बांधवांनी कोथिंबीर पिकाच्या सुधारित बियाण्याचा वापर केला पाहिजे.

3) सुधारित बियाणांची पेरणी केल्यास पेरणीनंतर कोथिंबीर काही दिवसातच उगवते. पावसाळ्याच्या दिवसात शेतकरी बांधवांनी वरंबा किंवा गोट बांधून कोथिंबीर पेरली पाहिजे.

4) कोथिंबीर पेरण्यापूर्वी त्याच्या बिया चार दिवस आधी तागाच्या गोणीत भिजवल्या जातात. यामुळे कोथिंबीर लवकर अंकुरण पावते.

5) अशा पद्धतीने कोथिंबीर लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.