कर्जत : पाणंद रस्त्याची चौकशी लागल्याने च राष्ट्रवादी च्या काही कार्यकर्ते चे संतुलन बिघडले – सुनील यादव
कर्जत तालुक्यातील पाणंद रस्त्याची चौकशी लागल्यानेच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांचे संतुलन बिघडले आहे असा आरोप ़़ भाजपा किसान आघाडी अहमदनगर उपाध्यक्ष सुनील काका यादव यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला आहे.
यादव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील जनतेने निवडून दिलेले आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे याच्यावर रडीचा डावा खेळत आहेत असा आरोप करून विधान परिषद आमदारांचा अवमान करत आहेत.
राम शिंदे यांना विधानपरिषद निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळाली व ते जनतेने निवडून दिलेल्या आमदाराच्या मतावर पुन्हा आमदार झाले आहेत. राम शिंदे आमदार झाले म्हणून रोहित पवार यांच्या पासून काही कार्यकर्ते नाराज झाले म्हणून च राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते सैरभैर झाले म्हणून विरोध करतात पण कधीही छोट्या मोठ्या संस्थेवर लोकप्रतिनिधी होता आले नाही.आपल्या स्वतःच्या ग्रामपंचायत मध्ये डिपाॅजीट जप्त झाले होते, डिपाॅजीट जप्त झालेल्यांनी वायफाय बडबड करून आपण फार मोठा नेता आहोत अशी फुशारकी मारू नये कर्जत ची जनता सुज्ञ व सर्व जानते की कामदार व दमदार आमदार कोण आहे. निव्वळ भूल धापा व खोटे आश्वासन कोण देते हे सर्व जनता ओळखून असल्याने च आपण नुसते सोशल मीडियावर पोस्ट टाकून आमदाराच्या मनात जाण्याचा व भ्रमनिरास करण्याचा आटापीटा करतात हे संपूर्ण मतदारसंघाच्या लक्षात आले आहे. पाणंद रस्त्याची चौकशी लागल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे संतुलन बिघडले आहे म्हणूनच राम शिंदे चा राजीनामा मागत आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धमक असेल तर रोहित पवार याचा राजीनामा घेऊन या मीही राम शिंदे यांचा राजीनामा घेऊन येतो होवून जाऊदे एकदा जनतेच्या मनातील आमदार कोण आहे ते…..
रामजी शिंदे साहेबांनी कर्जत शहररासाठी खेड वरून पाईप लाईन आणली होती त्याचे पाणी फिल्टर करून सर्व नगरपंचायत हद्दीत जनतेला पिण्यासाठी पाणी चालू होते पण तुमच्या जाहिरातीसाठी पाईप लाईन बंद करून कर्जत शहरामध्ये टँकर चालू करून त्याच्यावर तुमच्या आमदारांचा फोटो लावून जाहिरात बाजी चालू केली आहे…… महत्त्वाचं म्हणजे मोटर नादुरुस्त सांगत आहेत…. मग मोटर नवीन मिळत नाही का पण फक्त जाहिरात बाजीसाठी जनतेला वेठीस धरायचे. हे खपवून घेणार नाहीत
सुनील काका यादव
भारतीय जनता पार्टी किसान आघाडी अहमदनगर