ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

अहमदनगर जिल्ह्यामध्ये लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय ? जाणून घ्या काय आहे सत्य ?

अहमदनगर पोलिसांकडून यासंदर्भात स्पष्टीकरण .

अहमदनगर जिल्ह्यामध्ये लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा पसरत आहेत यासंदर्भात अहमदनगर पोलिसांकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे . लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा पसरत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे . जुने काही व्हिडिओ आणि छायाचित्रांमधे तोडफोड करून समाज माध्यमावर संदेश पसरवून जनतेमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्यात येत आहे.

याबाबत पोलीस सतर्क असून कोणतीही परिस्थिती हाताळण्याची तयारी करण्यात आली आहे. आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते.

अशा कुठल्याही प्रकारची टोळी सक्रिय झालेली असल्याच पोलिसांकडून सांगण्यात आले आहे . जर आपल्या परिसरामध्ये कोणी संशयित मिळून आल्यास त्यास कुठल्याही प्रकारची मारहाण न करता पोलिसांशी संपर्क साधावा. जर एखाद्या व्यक्तीस मारहाण झाली तर अशा प्रकारचे प्रसारित होणारे संदेश आपण फॉरवर्ड करू नयेत अगर वायरल करू नये. असे संदेश जाणीवपूर्वक वायरल केल्यास आपणाविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वरील कारणामुळे कोणीही घाबरून न जाता जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

Recovery after piles laser surgery ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे