जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरण, वन विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कर्जत प्रांत कार्यालयासमोर उपोषण , जाणुन घ्या नेमके काय आहे प्रकरण!

कर्जत / प्रतिनिधी : कर्जत जामखेड तालुक्यातील वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गावर महाविकास आघाडी सरकारने राजकीय दोषापायी कारवाई करून खोटा गुन्हा दाखल करून अन्याय केला म्हणून कर्जत चे प्रांत अधिकारी याच्या कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या बाबत प्रांत अधिकारी डाॅ अजित थोरबोले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१४-२०१५ पासुन महाराष्ट्र शासनाने पाणी टंचाई दुरू व्हावी या उद्देशाने देवेंद्र फडणवीस
सरकारने जलयुक्त शिवार योजना राज्यात राबविण्यात आली. या योजनेत कर्जत जामखेड तालुक्यातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात ही जलयुक्त शिवार योजनेतून कामे करण्यात आली वनविभागाच्या जंगलात जलयुक्त शिवार चे कामे अतिशय चांगली व शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार जलयुक्त ची कामे पूर्ण झाली आहेत. या कामाबाबत ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी अथवा कोणीही तक्रार केलेली नाही. याशिवाय विभागीय चौकशी ही झालेली आहे. असे असताना ही जाणीव पुर्वक महाविकास आघाडी सरकारने मागील सरकारला बदनाम करण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी याच्यावर अकासापोटी खोटा गुन्हा पोलिसात दाखल करून कामावरून निलंबित केले आहे.
वास्तविक पाहता वनविभागाने वनक्षेत्रात सलग सम पातळीची कामे केली होती. या कामामुळे वनक्षेत्राच्या आरती भवती शेतकऱ्यांन मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. या कामांचे क्राॅस चेगिंग ही जिल्हाधिकारी याच्या कडून करण्यात आले होते. वनविभागाने केलेल्या कामाचे आयुष्यमान फक्त पाच वर्षे होते. असे असताना महाविकास आघाडी सरकारने पुर्वीच्या जलसंधारण मंत्री याच्या मतदारसंघात फक्त चौकशी करून राज्यात कोठेही कारवाई न करता फक्त कर्जत जामखेड तालुक्यात च केली आहे. जलयुक्त शिवार अभियान हे संपूर्ण राज्यात राबविले गेले होते या अभियानात राज्यात कर्जत तालुका हा प्रथम क्रमांक ने राज्यात आलेले होते राज्यात आर्दश काम झाले असताना ही आमच्यावर कारवाई झाली हे दुर्दैवी आहे.
महाविकास आघाडी सरकारने मागिल सरकारला राजकिय व्देषापोटो बदनाम करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले . वास्तविक
विभागीय चौकशी करुन त्याचा अहवाल मागवणे आवश्यक होते परंतु तसे करण्यात आले नाही. वनविभाग तांत्रिक बाबी जाणारे नाहीत. चौकशी करण्यासाठी आमची कोणतीच हरकत नाही पण ही चौकशी सर्व विभाग मिळवून करणे आवश्यक होते. पण ही चौकशी लाचलुचपत विभाग यांनी करून आमच्या वर कर्जत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून आमच्या वर विनाकारण खोटया गुन्हात अडकवण्यात आले आहे त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा म्हणून
शासनाच्या दारात उपोषण केले.
पितृ पक्ष 2022: पितृ पक्ष म्हणजे काय ? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व
या उपोषणाला . श्री . एस . आर . बोराडे तात्कालीन वनपरिक्षेत्र अधिाकरी कर्जत , . श्री . एस . व्ही . पाटील , वनपरिक्षेत्र अधिकारी तात्कालीन मिरजगाव . श्री . एम.बी.राठोड तात्कालिन वनपाल जामखेड . श्रीमती . पी . एस . जगताप , तात्का , वनपाल कोंभळी . श्री . एस . आर . पाटोळे , तात्का , वनरक्षक कोंभळी . श्री . बी . आर . गांगर्डे , तात्का . वनरक्षक कैडाणे . के. व्ही . वाय . शिंदे , वनपाल कोंभळी ( मयत ) यांचे वारस मुले उपोषणाला बसले होते.