ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

PM Kisan : शेतकऱ्यांना धक्का! सरकारने केली ‘ही’ सुविधा बंद, जाणून घ्या अधिक माहिती !

PM Kisan : शेतकऱ्यांना धक्का! सरकारने केली 'ही' सुविधा बंद, जाणून घ्या अधिक माहिती !
PM Kisan

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत 11 व्या हप्त्याचे 2000 रुपये पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले आहेत. आता लवकरच 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहेत. मात्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना 2022 मध्ये मोठा बदल केला आहे, याचा परिणाम हा देशभरातील शेतकर्त्यांवर होणार आहे . 

काय केले आहेत पीएम किसान सन्मान निधी योजना 2022 मध्ये बदल ?

शेतकरी पोर्टलवर जाऊन आधार क्रमांकावरून आपले स्टेटस पाहू शकणार नाहीत.

आपले स्टेटस पाहण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकणे अनिवार्य करण्यात आले आहे.  आता नवीन नियमानुसार, शेतकऱ्यांना आधार क्रमांकावरून स्टेटस पाहणे शक्य होणार नाही, तर मोबाईल क्रमांकावरून पाहू शकतील.

 

जाणून घ्या , पीएम किसान योजना 2022 स्टेटस चेक कसे करायचे ? 

– यासाठी तुम्ही पहिल्यांदा  pmkisan.gov.in या वेबसाईट  वर जा.
– येथे डावीकडील लहान बॉक्समध्ये Beneficiary Status वर क्लिक करा.
– आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.
– येथे तुमचा नोंदणी क्रमांक टाकून तुमचे स्टेटस चेक करा.
– तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसल्यास, Know Your Registration Number यावर क्लिक करा.
– आता यामध्ये तुमच्या पीएम किसान खात्यावर नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.
– यानंतर, कॅप्चा कोड भरा आणि Get Mobile OTP वर क्लिक करा.
– दिलेल्या बॉक्समध्ये तुमच्या नंबरवर मिळालेला OTP एंटर करा आणि Get Details वर क्लिक करा.
– आता तुमचा नोंदणी क्रमांक आणि नाव तुमच्या समोर दिसेल.

काय आहे पीएम किसान योजना?
दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojna) दरवर्षी 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात, जे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 11 हप्ते पाठवण्यात आले आहेत. जर अद्याप तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले नाहीत, तर सर्वात आधी तुमचे स्टेटस आणि बँक खाते चेक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

Recovery after piles laser surgery ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे