Crop Insurance : ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना, 375 कोटींचे वितरण
Crop Insurance: नांदेड जिल्ह्यातील शेतकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे , नांदेड जिल्ह्यातील जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मूग या पाच लाख 27 हजार 141 हेक्टरवरील पिकांसह 314 हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले होते. तर 66 हेक्टरवरील फळपिके एकूण पाच लाख 27 हजार 491 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
जिल्हा बँकेला प्राप्त झालेल्या तब्बल 691 कोटी 15 लाख या निधीपैकी 2 लाख 50 हजार शेतकऱ्यांना (Department of Agriculture) एटीएम आणि शाखेमार्फत 375 कोटी 30 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे उपसरव्यवस्थापक मारोतराव शिंदे यांनी दिली आहे.