अहमदनगर : भयंकर परिस्थिति ‘ लम्पी ‘ मुळे तब्बल इतकी जनावरे दगावली , या तालुक्यातील संख्या सर्वात जास्त !

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात देखील लम्पी (Lumpi) या आजाराने धुमाकूळ घातला आहे . लम्पी मुळे दगावलेल्या जनावरांची संख्या आता १०४० झाली आहे. तर जिल्ह्यात १६ हजार ६०० जनावरे या रोगाने बाधित आहेत. ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने अहमदनगर जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे.
लम्पी स्किन डिसीज हा गुरांमध्ये पोक्सविरिडे कुटुंबातील विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.या रोगाचा प्रसार / प्रसार / प्रसार माश्या, टिक्स आणि डासांच्या चाव्याव्दारे प्राण्यांमध्ये होतो. या रोगाची लागण झालेल्या जनावरांना सौम्य ताप येतो.
अहमदनगर जिल्ह्यात १५ लाख जनावारांचे लसीकरण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तरीही लम्पी रोगाची बाधा आणि मृत्यू होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत आहे.
हे पण वाचा : टोमॅटो बाजारभाव ,टोमॅटोच्या दरात घसरण, दर डायरेक्ट 25 ते 30 रुपयांवर