नवरदेव आवडत नाही… म्हणून लग्नाच्या 22 व्या दिवशी नवरीने केला नवरदेवाचा खून !
बीड : लग्नानंतर 22 व्या दिवशी एका तरुणाचा मृतदेह त्याच्या बेडरुममध्ये आढळून आला होता. यावेळी त्याच्या सोबत त्याची पत्नी देखील होती. तो बेशुद्ध असल्याची माहिती पण तिनेच नातेवाईकांना दिली त्यानंतर रुग्णालयात नेल्यानंतर या तरुणाला मृत घोषित करण्यात आले ही धक्कादायक घटना 7 नोव्हेंबर रोजी रात्री तालुक्यातील निपाणीजवळका येथे घडली होती. या प्रकरणात आता नातेवाईकांनी आपल्या सुनेनेच मुलाला मारल्याचा आरोप केला आहे . अखेर तपासानंतर गेवराई पोलिसात पत्नी विरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आवडत नसल्याने नववधूकडून नवरदेवाचा बीडमध्ये खून
नवरदेव आवडत नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय 22, रा. निपाणीजवळका तांडा) याचे व शितल (रा. पौळाचीवाडी ता. जि. बीड) यांचे दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी पौळाचीवाडी येथे रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. त्यानंतर नवरदेव मुलगा राजाभाऊ मला आवडत नाही, असे म्हणून शितल त्याच्यासोबत सतत भांडण करत असे. दरम्यान दि. 7 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 11.00 ते 11.30 दरम्यान हे नवदाम्पत्य आपल्या बेडरुममध्ये झोपले असता रात्री 11.30 दरम्यान शीतल बेडरुम बाहेर येऊन सासू-सासर्याला म्हणू लागली की, पांडुरंग हे गार पडले आहेत. यांनतर दवाखान्यत तरुणाला मृत घोषित करण्यात आले