Ahmednagar : कर्जत तालुक्यातील या गावांतील अंगणवाड्या मध्ये निकृष्ट दर्जाच्या मिरची पावडर, दाळ व मिठ पुरवठा,कारवाईची मागणी

 

काल्पनिक फोटो 

Ahmednagar: शासनाच्या बालविकास प्रकल्प कार्यालया (Government Child Development Project Office)मार्फत लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रत्येक गावात अंगणवाड्या चालविल्या जात आहे . कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून अंगणवाडी प्रवेशित बालकांचे आरोग्य (Child health) सुदृढ राहण्यासाठी तीन महिन्यांत एकदा पोषण आहार योजनेंतर्गत प्रत्येक बालकासाठी गहू , …

तांदूळ , चना , साखर , मिश्रित दाळ , हळद , मीठ आणि मिरची पावडरचा पुरवठा खासगी पुरवठादारांकडून केला जात आहे . 
खाजगी पुरवठादार यांच्या कडून अनेक वस्तूंचा निकृष्ट पुरवठा होतो आहे. या निकृष्ट दर्जाच्या पुरवठा बाबतीत तालुका व जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. 
निकृष्ट दर्जाच्या मिरची पावडर, दाळ व मिठ पुरवठा केला जात असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन संबंधित साहित्य पुरवठादाराला सूचना देऊन कारवाई …करण्याची मागणी केली जात आहे . 
कर्जत तालुक्यातील बहुतेक ठिकाणी बालविकास प्रकल्प कार्यालया (Child Development Project Office) कडून अंगणवाडी केंद्र सुरु आहेत . या अंगणवाडी केंद्रात प्रवेशित विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ आणि चांगले राहावे आणि कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी शासनाने अंगणवाडी केंद्रामार्फत पोषण आहार योजना कार्यान्वित केली आहे . त्या …अंतर्गत प्रत्येक प्रवेशित बालकाला तीन महिन्यातून एकदा १-१ किलो गहू , तांदूळ , चना , साखर , द्विदलमिश्रित डाळ आणि २००-२०० ग्रॅमची हळद , मीठ , मिरची पावडर पॅकेट आणि गरोदर आणि स्तनदा महिलांसाठी अंडी आणि फळे इत्यादी वस्तूचे वाटप खाजगी पुरवठादारांकडून पुरविले जाते . 
परंतु माहे जानेवारी महिन्यात पुरविण्यात आलेल्या साहित्यामधील मिरची … नागण पावडर , दाळ व मिठ अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे . त्यामुळे जीवाणूचा प्रादुर्भाव होऊन बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही . या प्रकाराकडे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन चांगल्या मालाचा किंवा साहित्याचा पुरवठा करण्यात यावा , अशी सूचना देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे .. …
Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment