Ahmednagar :आ रोहित पवार- खा. सुजय विखेच्या आरोग्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने श्री गोदड महाराजांना लघुरुद्र

Post by

 ग्रामदैवत श्री गोदड महाराजांना आ रोहित पवार- खा. सुजय विखेच्या आरोग्यासाठी  अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने  लघुरुद्र

ग्रामदैवत श्री गोदड महाराजांना आ रोहित पवार- खा. सुजय विखेच्या आरोग्यासाठी  अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने  लघुरुद्र

कर्जत (प्रतिनिधी):-आमदार रोहित (दादा) पवार व अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय (दादा) विखे पाटील यांच्या आरोग्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ, अहमदनगर दक्षिण यांच्या वतीनेकर्जतचे ग्रामदैवत संतश्रेष्ठ सद्गुरु श्री गोदड महाराज यांच्या समाधीस लघुरूद्ध अभिषेक करून महाआरती करण्यात आली.

           कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित (दादा) पवार व अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय (दादा) विखे पाटील या दोन्ही नेत्यांना एकाच दिवशी कोरोणाची लागण झाली. या दोन्ही लोक प्रतिनिधीना उत्तम आरोग्य लाभावे व कोरोनातुन हे दोघे ही लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेत रुजु होण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ, अहमदनगर दक्षिण व अखिल भारतीय मराठा महासंघ, कर्जत-जामखेड यांच्या वतीने कर्जतचे ग्रामदैवत संतश्रेष्ठ सद्गुरु श्री गोदड महाराज यांच्या समाधीस लघुरूद्ध अभिषेक व महाआरतीचे आयोजन शनिवार दि. ०८/०१/२०२२ रोजी सकाळी ६ ते ९.३० या वेळेत करण्यात आले. 

         कर्जतचे ग्रामदैवत संतश्रेष्ठ सद्गुरु श्री गोदड महाराज मंदिरात अखिल भारतीय मराठा महासंघ, अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बिभिषण खोसे पाटील यांनी लघुरुद्रचे आयोजन केले. आमदार रोहित (दादा) पवार व अहमदनगर दक्षिणचे युवा खासदार डॉ सुजय (दादा) विखे पाटील या दोन्ही नेत्यांना एकाच दिवशी कोरोणाची लागण झाली. या दोन्ही लोक प्रतिनिधीना उत्तम आरोग्य लाभावे व कोरोनातुन हे दोघे ही लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेत रुजु होण्यासाठी लघुरुद्रास सकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली, अ. भा. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बिभिषण खोसे पाटील, शेतकरी जिल्हाध्यक्ष गंगाधर बोरुडे, कर्जत तालुकाध्यक्ष सतिष पठाडे, 

जामखेड तालुकाध्यक्ष पै. दत्ताजी शिंदे, 

शहराध्यक्ष प्रफुल्ल काळे, भाऊसाहेब तोरडमल, आशिष बोरा, बाळासाहेब गोसावी, सचिन पवार, शिवराजे खोसे पाटील, यांनी अभिषेक करत श्री गोदड महाराजांच्या समाधीस तूप, खोबरे तेल, पिठी साखर, मध, उटणे व इतर साहित्याने धुवून काढत अभिषेक करत लघुरुद्रास सुरुवात केली, या लघुरुद्रात प्रवीण घुले, अंबादास 

पिसाळ, दादा सोनमाळी, सुनील शेलार, विशाल म्हेत्रे, बाळासाहेब साळुंके, गणेश तोरडमल, सौरभ पाटील, मल्हारी खिळे, यांनी रुद्र आवर्तने दिली. यावेळी मेघादादा पाटील, सचिन घुले

श्रीहर्ष शेवाळे, अण्णा म्हेत्रे, रमेश तोरडमल, रवी पाटील, सौ. मोहिनी घुले, स्वाती पाटील, संगीता खोसे, सायली खोसे, आदिती घुले, निखिल पाटील, अमित तोरडमल, निलेश ढेपे, निलेश शिंदे, श्रीनाथ अणपट, सोनूभाऊ मुरकुटे, आदींनी सहभागी होत आरती करून दोन्ही लोक प्रतिनिधीच्या आरोग्याची मनोकामना व्यक्त केली. शेवटी संत श्री गोदड महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ काकडे यांनी सर्वाना महाराजाचा प्रसाद म्हणून नारळ दिले.

Leave a comment