Arogya Setu App: राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयुष्मान भारत डिजिटल अभियान (ayushman bharat digital campaign) या त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या योजनेअंतर्गत भारत सरकारच्या आरोग्य सेतू या अत्यंत लोकप्रिय आरोग्यविषयक ॲपचे एकीकरण करण्याची घोषणा केली आहे. या एकीकरणामुळे 14 अंकी विशिष्ट आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक वापरण्याचे लाभ आता आरोग्य सेतू ॲपचे वापरकर्ते आणि त्यापलीकडे अनेकांना घेता येणार आहेत.
आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक फायदे
आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत, वापरकर्ते त्यांचा विशिष्ट शकतो. हा क्रमांक डॉक्टरांची औषधयोजना, प्रयोगशाळेतील तपासण्यांचे अहवाल, रुग्णालयातील नोंदी यांसह त्यांच्या सध्याच्या आणि नव्या आरोग्य विषयक नोंदींशी जोडता येतो आणि या नोंदी नोंदणीकृत आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य सेवा पुरवठादारांशी सामायिक करता येतात. तसेच आरोग्यसंबंधी इतिहासाचा सामायिक साठा करतानाच नागरिकांना इतर डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ देखील घेता येतो.
आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयारकसा करायचा ?
आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करणे ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. वापरकर्त्याला त्याचा आधार कार्ड क्रमांक आणि नाव, जन्मवर्ष (किंवा जन्मतारीख), लिंग आणि पत्ता (एकदा आधार ओटीपी द्वारे वापरकर्त्याची पडताळणी झाली की पत्ता आपोआप दिसू लागेल) यांसारख्या लोकसंख्याविषयक काही मुलभूत तपशीलांची माहिती वापरून हा क्रमांक मिळवता येईल.
जर वापरकर्त्याला आधार क्रमांक वापरायचा नसेल तर वाहन चालविण्याचा परवाना अथवा मोबाईल क्रमांक वापरून देखील आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक मिळविता येईल. वापरकर्त्याला त्याचा आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक https://abdm.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करून किंवा https://play.google.com/store/apps/details?id=in.ndhm.phr या आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक ॲपवरुन मिळवता येईल अथवा आयुष्मान भारत डिजिटल अभियानासोबत एकत्रित करण्यात आलेल्या इतर ॲपचा वापर करून मिळवता येईल.