Audumbar Panchami 2022: का साजरी करतात ‘ औदुंबर पंचमी ‘ काय असते विशेष महत्व ,जाणून घ्या !

Audumbar Panchami 2022: का साजरी करतात ' औदुंबर पंचमी ' काय असते विशेष महत्व ,जाणून घ्या !


Audumbar Panchami 2022: श्री दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षाचे माहात्म्य आहे. औदुंबर वृक्षाच्या ठायी साक्षात् भगवान श्रीदत्तप्रभूंचाच वास असतो अशी मान्यता आहे . माघ कृष्ण पंचमी, या तिथीला औदुंबर पंचमी (Audumbar Panchami) म्हणतात यावर्षी ‘ औदुंबर पंचमी ‘ हि सोमवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी साजरी होत आहे.

या दिवशी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम, प.पू.सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंती असते. दि. ७ फेब्रुवारी १८३६, माघ कृष्ण पंचमीला श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचा जन्म झाला. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी बालपणीपासूनच अलौकिक लीला करीत असत.

तरुणपणी ते सद्गुरुभेटीच्या ओढीने अक्कलकोटला गेले. इकडे श्री स्वामी समर्थ महाराज सारखे, ” माझा कृष्णा येणार !” असे म्हणत खुशीत होते. श्रीकृष्ण स्वामी अक्कलकोटाच्या वेशीजवळ पोचले नाहीत तोवरच स्वामी महाराज मठातून घाईने निघाले. लहानग्या श्रीकृष्णाचा हात धरून ते जवळच्या जंगलात घुसले. तब्बल सात दिवसांनी हे दोघे गुरु-शिष्य परत आले. त्यानंतर श्रीगुरु स्वामी महाराजांच्या आज्ञेने श्रीकृष्ण सरस्वती स्वामी कोल्हापूरला आले.


श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या लीला अद्भुत आहेत. ते बालोन्मत्तपिशाचवत् राहात असत. ते कुंभार गल्ली मध्ये राहात असत, म्हणून त्यांना ” कुंभारस्वामी ” असेही म्हटले जाते. त्यांनी श्रावण कृष्ण दशमी, दि.१९ ऑगस्ट १९०० रोजी महासमाधी घेतली. स्वामी ज्या ठिकाणी राहात असत, त्या ” वैराग्य मठी ” मध्येच त्यांची समाधी बांधण्यात आली.
श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या भक्तांनी त्यांच्याच दृष्टांतानुसार आणखी एक मठ गंगावेशीपाशी बांधला, त्याला ” निजबोध मठी ” म्हणतात. तेथे स्वामींचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आलेला आहे. त्यांचे सविस्तर चरित्र www.shri-datta-swami.net या साईटवर उपलब्ध आहे.


Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment