Fake company’s drug sales: बनावट औषध विक्री व खताची वाढीव रक्कम घेणाऱ्या कृषी दुकान चालकांवर गुन्हा दाखल karjat पोलिसांची कारवाई
अस्तित्वात नसलेल्या बनावट कंपनीची औषध विक्री (Fake company’s drug sales) करणाऱ्या व निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने युरिया खताची विक्री करणाऱ्या कृषी चालकांवर तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने कृषी व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.नंदराज अहिरे व लक्ष्मण गणपत हूमे (दोघेही रा. मिरजगाव)अशी या कृषी दुकान चालक आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी,’तालुक्यातील गुरवपिंप्री येथील शेतकरी प्रकाश बबन गावडे व विनोद शांतीलाल गावडे यांनी आपल्या शेतात (Biosul) बायोजुल औषध फवारणी केल्यामुळे पूर्णवाढ झालेल्या फळांची गळती झाल्याबाबत दि.१८ऑगस्ट २०२१ रोजी कर्जतच्या कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार केली होती.तक्रारीच्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के व पंचायत समितीचे कृषी अधिकारी रुपचंद जगताप यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या डाळींब बागेस भेट देऊन जळालेल्या फळांची पाहणी केली.यावेळी औषध विक्री केलेल्या यश ऍग्रो कन्सल्टन्सी चे केंद्रचालक नंदराज अहिरे यांनाही घटनास्थळी उपस्थित राहण्यास सांगितले.यावेळी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.तक्रारदारांच्या मागणीनुसार बायोजुल हे औषध ग्रीन क्रॉप ऍग्रो इंडस्ट्री (Green Crop Agro Industry) यांच्याकडून मागवून दिले.संबंधित कंपनीकडूनच बिल मिळाले नसल्याचे चालकांनी जबाबात नमूद केले आहे.
कारण त्यांनी गावडे यांना औषधाचे बिलही दिले नव्हते.त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी तालुका निविष्ठा तक्रार निवारण समितीने सदरील प्लॉटची पाहणी केली असता फळगळ झाल्याचे निदर्शनास आले.याबाबत दुकान चालकास विचारणा केली असता,’संबंधित औषध हे एल.जी. हुमे यांच्याकडून आणुन तक्रारदारांना दिले असल्याचा जबाब चालकाने दिला.औषधाच्या आवरणावर असलेल्या कस्टमर क्रमांकावर फोन करून खात्री केली असता हा क्रमांक भुमी ऍग्रोचे संचालक हुमे यांचा असल्याचे आढळून आले.ग्रीन क्रॉप ऍग्रो इंडस्ट्रीज या कंपनीची माहिती घेण्यासाठी निविष्ठा व गुण नियंत्रक कृषी आयुक्तालयाला कळविण्यात आले.मात्र संबंधित कंपनीच अस्तित्वात नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.तसेच परवाना क्रमांकही बनावट असल्याचे त्यांनी कळवले.त्यानंतर दि.२९ सप्टेंबर रोजी नंदराज अहिरे यांच्या यश ऍग्रो एजन्सीची तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता खताचे बिलबुक पडताळल्यावर युरिया खताची विक्री ही शासनाच्या निर्धारित रकमेपेक्षा ३५ रुपयांनी जास्त आकारली जात असल्याचे आढळून आले.
हे पण वाचा – ग्राम पंचायत सदस्य च्या पतीची दारू पकडली
हे पण वाचा – Nagar Panchayat Karjat election: नगरपंचायत च्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अठ्ठावीस अर्ज दाखल
त्यामुळे दोन्ही चालकांनी अस्तित्वात नसलेल्या बनावट बायोजुल नावाची औषध विक्री करून तसेच नंदराज अहिरे यांनी निर्धारित दरापेक्षा जास्त दराने खताची विक्री करून फसवणूक केल्याने कर्जत पोलिसांनी भा.द.वी कलम ४२० तसेच खत नियंत्रण कायदा १९८५ कलम ७,८,३५(१) व अत्यावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अमरजीत मोरे, महादेव कोहक करत आहेत.