Gudi Padwa 2023 date: गुढीपाडवा कधी आहे,जाणून घ्या माहिती आणि महत्व

Gudi Padwa 2022 date: गुढीपाडवा कधी आहे,जाणून घ्या माहिती आणि महत्व

 

Gudi Padwa 2023 date:हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुडीपाडवा (Gudi Padwa)  साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. तसेच हा दिवस वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. Gudi Padwa 2023 बद्दल अधिक माहिती पुढे आपण पाहणार आहोत .

गुडीपाडवा कसा साजरा करतात ? (How to celebrate Gudipadva)

या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात , नवीन  व्यवसाय प्रारंभ करतात , नव उपक्रम प्रारंभ करतात , गुडीपाडव्याला सोने चांदी खरेदी केली जाते तसेच दारात दुकानं यांच्या पूढे गुडी उभारली जाते  दारी उभारलेली गुढी हे आणि समृद्ध प्रतीक असे विजयी होते. गुढी पाडव्यापासून राम जन्मोत्सवाचा कार्यक्रमही प्रारंभ होतो.

गुडी कशी उभारतात ?

या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या ठेवला जातो ,पुजा केली जाते ,पुरणपोळि चा प्रसाद दाखवला जातो . संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते.या दिवशी सोशल मीडिया वर आपले मित्र नातेवाईक यांना नवीन वर्षाच्या आणि गुडीपाडव्याच्या शुभेच्छा (Happy Gudipadva) दिल्या जातात ,या शुभेच्छा डाउनलोड करण्यासाठी खालील पोस्ट पाहू शकता .

गुडीपाडव्याचा इतिहास काय आहे ? (What is the history of Gudipadva?)

चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो.
महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात.
श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.