Karjat: कर्जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार माळवे याचा सत्कार

Post by

   कर्जत येथील पत्रकार दैनिक नवराष्ट्र पुणे चे तालुका प्रतिनिधी सुभाष पंढरीनाथ माळवे यांना स्व  मोहनलाल बियाणी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व मराठवाडा साथीच्या वतीने देण्यात येणाऱ्या सकारात्मक लेखन या विषयावर देण्यात आला आहे. 

सुभाष माळवे यांनी गेली ३० वर्षांपासून पत्रकार म्हणून काम करत आहेत. निर्भीड पणे व धडाडीचेपत्रकार म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे. 

हा पुरस्कार मिळाला म्हणून आरपीआय चे राज्य चे उपाध्यक्ष शशिकांत दादा पाटील यांनी सुभाष माळवे यांचा सत्कार केला या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे, खजिनदार मुन्ना पठाण, अफरोज पठाण, आशिष बोरा, डाॅ दयानंद पवार व लखन भैलुमे आरपीआय चे तालुका उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.

कर्जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार माळवे याचा सत्कार 

कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे यांच्या हस्ते राज्य स्तरावर वरील पुरस्कार जाहीर झाल्याने नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी सुभाष माळवे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे, नुतन पत्रकार संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र अनारसे, उपाध्यक्ष निलेश दिवटे, सरचिटणीस अफरोज पठाण, मुन्ना पठाण आदी उपस्थित होते. 

कर्जत तालुका प्रेस क्लब यांच्या वतीने माळवे याचा सत्कार

राज्यस्तरीय पुरस्कार सुभाष माळवे यांना जाहीर झाल्यानें कर्जत तालुका प्रेस क्लब च्या वतीने पत्रकार प्रा. किरण जगताप, योगेश गांगर्डे, अस्लम पठाण, विनायक ़ढवळे यांनी पत्रकार सुभाष माळवे याचा सत्कार केला.

Leave a comment