Karjat Nagar Panchayat Election रणसंग्राम तापला : उमेदवार जोमात, सर्वसामान्यांमध्ये पूर्वानुभवातून निरुत्साह

Post by

कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम तापला : उमेदवार जोमात, सर्वसामान्यांमध्ये पूर्वानुभवातून निरुत्साह

कर्जत: नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर इच्छुक उमेदवारांमध्ये आता धावपळ सुरु झाली आहे. २१ डिसेंबरला मतदान होणार असून त्यासाठी १४ डिसेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. केवळ सहा दिवसात मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहचविण्यास उमेदवारांनची चांगलीच दमछाक होणार आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी चा झेंडा फडकविण्यासाठी रोहित दादा पवार यांनी कोणतीही कसर ठेवली नाही.राष्ट्रवादीकाँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी आमदार रोहित दादा पवार यांनी  कर्जत मधील सर्व गट तट एकत्र करून निवडणूकीची तयारी केली आहे. 

 २१ डिसेंबरला होणाऱ्या नगरपंचायतीच्या निव डणुकीत सध्या तरी सहा पक्ष व अपक्ष  रिंगणात उतरले असल्याचे चित्र आहे. तालुक्यात काँग्रेसची मदारही तशीही प्रविण घुले यांच्या

 खांद्यावर आहे. 

दरवर्षीपेक्षा यावर्षी उमेदवारांना मिळालेला अवधी फारच कमी असल्याने जाहीर नामा, मतपत्रिका नमुना व इतर प्रसिद्धी पत्रके छापून मतदारांच्या हाती देताना कार्यकर्त्यांनसह उमेदवार यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. उमेदवार हे मोजक्याच कार्यकर्त्यांसह कामाला लागले आहेेत

चौकट

नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वसामान्यांना रस नसल्याचे चित्र

 निवडणुकीचा मागील पाच वर्षाचा इतिहास अत्यंत धक्कादायक राहिला. सत्तेसाठी पक्ष व गट ऐन

वेळेवर कुणाच्या मांडीवर जाऊन बसेल हे सांगता येत नाही. वर्षानुवर्षे काहीही घेणे-देणे नसताना अनेकांनी नेत्यांसाठी विनाकारण मानसिक त्रास व वाईट पणा घेतला. 

मनातून दुरावलेले कार्यकर्ते निपचित पडून आहे. मनोमिलन कार्यक्रम करण्याचा प्रयत्न झाला. तसा तो दरवर्षी होतो. परंतु, त्याचा काही फायदा होत नाही. यंदाही तीच परिस्थिती निर्माण होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. आजचे

  चित्र कार्यकर्त्यांची फटफजिती झाली. ते आहे.

Leave a comment