Maha shivaratri 2022 : महाशिवरात्र कधी आहे, जाणून घ्या शुभमुहूर्त , माहिती आणि महत्व

Maha shivaratri 2022


 Maha shivaratri 2022:महाशिवरात्री, भारतीय पवित्र उत्सवांपैकी सर्वात मोठा आणि अतिशय महत्वाचा उत्सव मानला जातो.माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो .

महाशिवरात्री माहिती आणि महत्व 

शिवरात्रीचा सण हा भगवान शिव आणि शक्ती यांच्या मिलनाचा हिंदू सण आहे, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातील शिवरात्रीला आपण महाशिवरात्री म्हणतो. महाशिवरात्री हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी शिव उपासक मंदिरात शिवलिंगाची पूजा करतात आणि रात्र जागरण करतात. Maha shivaratri 2022- महाशिवरात्र कधी आहे   हे आता या पोस्टमध्ये जाणून घेऊया.

महाशिवरात्र  २०२२ कधी आहे?

दरवर्षी प्रमाणे या वर्षी महाशिवरात्र हि १ मार्च २०२२ रोजी साजरी केली जाणार आहे .

महाशिवरात्रीची वेळ 2022 मुहूर्त- महाशिवरात्री 2022 पूजा मुहूर्त 

सहसा शिवरात्रीचा उपवास दर महिन्याला येतो, ज्याला आपण मासिक शिवरात्री म्हणतो, परंतु माघ महिन्यात, कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या वर्षी होणार्‍या महाशिवरात्रीचा मुहूर्त (महाशिवरात्री 2022 पूजा मुहूर्त) पुढीलप्रमाणे आहे-

निशीथ काल पूजा मुहूर्त – सकाळी 12:8 ते 12:58 पर्यंत. ज्याची वेळ मर्यादा सुमारे 50 मिनिटे असेल.

महाशिवरात्री पारण मुहूर्त – सकाळी ६.४५, दिवस २ मार्च.

चतुर्दशी तारीख सुरू होते- 1 मार्च 2022 सकाळी 3:16 वाजता.

चतुर्दशी तारीख संपेल – 2 मार्च 2022 सकाळी 1 वाजता.

Leave A Reply

Your email address will not be published.