sindhutai sapkal shradhanjali: भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

Post by

 सिंधूताईंच्या अचानक जाण्याने सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, हजारो अनाथ/निराधार बालकांचा सांभाळ, त्यांचे शिक्षण, नंतर लग्न करून देणे अशी समाजसेवा तारेवरची कसरत, या अतुल्य कामासाठी मानाचा मुजरा, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो🙏

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन.

आयुष्यात अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत त्यांनी अनेक मुलांचे संगोपन केले. 

माऊलीला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

पद्मश्री, समाजभूषण, अनाथांची यशोदा, 

सगळ्यांची माय सिंधुताई सपकाळ 

आज आपल्यात नाहीत. … 

सिंधूताई सपकाळ यांच्या बद्दल तुम्हला माहित नसणाऱ्या १० गोष्टी ,जाणून घ्या !

अखंड सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

 

खरंच दुःखद घटना

त्यांच्या आजवरच्या महानकार्याला मानाचा मुजरा 🙏🏻

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचर्णी प्रार्थना 🙏🏻

जगाने पाठ फिरवलेल्या लेकरांना जिथून जिथून उचलून त्यांनी वाढवलंय, ती मुलं मोठी होऊन आज जगभरात पसरलीयत. त्यांच्या रुपात सिंधुताई अव्याहत जगभरात रुजल्या आहेत.. ‘आईपण’ काय असतं याचं बीज पेरल्याबद्दल जन्मभर त्यांची ऋणी 🙏🏽🙏🏽

सिंधुताईं च्या निधनाची बातमी कळताच धक्का बसला, मन सुन्न झालं,काही दिवसांपूर्वीच माईंची  भेट झाली होती. इतकी सकारात्मक , हसतमुख, जगण्यात प्रचंड उर्जा असणारी व्यक्ती मी पाहिली नाही.

‘पोरक्यांना आपलसं करणाऱ्या माई गेल्या अन् महाराष्ट्र पोरका झाला’

 शांती लाभो 🙏 

अनाथांच्या नाथ,उपेक्षितांना मायेची ऊब देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री माई सिंधुताई यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन सुन्न झाले. त्यांच्यावर प्रेम करणारा अवघा महाराष्ट्र आज पोरका झाला. दुःखाचा डोंगर पेलून तुम्ही माया, प्रेम अबाधित ठेवलं. माई,तुम्ही महानच ! भावपूर्ण आदरांजली! 🙏 

सिंधूताई सपकाळ यांचे निधन

Leave a comment