Vasant Panchami 2022 : वसंत पंचमी ,माहिती आणि महत्व
vasant panchami 2022 date:वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे. भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे.यावर्षी ५ फेब्रुवारी २०२२ रोजी वसंत पंचमी आहे .