एबीपी माझा

एबीपी माझा ही पश्चिम बंगालच्या आनंद बाझार पत्रिका (एबीपी) या वृत्तसमूहाची २४ तास मराठी बातम्या देणारी वृत्तवाहिनी आहे.

या वृत्तवाहिनीची सुरुवात २२ जून इ.स. २००७ रोजी झाली.

या वृत्तवाहिनीचे जूने नाव 'स्टार माझा' होते

राजीव खांडेकर हे मुख्य संपादक आहेत.

स्टार ग्रुप आणि भारतीय आनंद बझार पत्रिका या दोन संस्थांनी ३१ मार्च इ.स. २००३ रोजी या वाहिनीची स्टार माझा या नावाने सुरुवात केली.

ही वाहिनी मीडिया कन्टेन्ट ॲंन्ड कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमसीसीएस) या कंपनीच्या अखत्यारीत चालते.

एमसीसीएस एबीपी टीव्ही आणि स्टार न्यूज ब्रॉडकास्टिंग लिमिटेड या दोन कंपन्याच्या ७४:२६ भागीदारीत चालते.

भारतातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित वृ्त्तसमूहांमध्ये आनंद बझार पत्रिका ग्रुपची गणना होते. पूर्व भारतामध्ये या समूहाची अनेक प्रकाशने आहेत, आनंद बझार पत्रिका हे बंगाली भाषेतील सर्वाधिक खपाचे दैनिक आणि द टेलिग्राफ हे पूर्व भारतात सर्वाधिक खपणारे इंग्रजी दैनिक याच समूहाच्या मालकीचे आहे.

द स्टार ग्रुप हा अशियातील अग्रगण्य मीडिया ग्रुप आहे. अशियामध्ये स्टारच्या पन्नास वाहिन्या ९ भाषांतून ५३ देशातील सुमारे ३० कोटी प्रेक्षकांपर्यंत पोचतात.