पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरापासून ते गल्लीबोळ्यातील विठ्ठल मंदिरं देखील आषाढी एकादशीच्या निमित्ताने उजळून निघतात.

यंदा  10 जुलैला आषाढी एकादशी  साजरी केली जाणार आहे.  या निमित्ताने वारकरी, विठू माऊलींच्या भक्तांनी महिना भरापूर्वीपासून वारीत सहभाग घेतला आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढ एकादशीला दिंड्या पंढरपूरात पोचतात. खानदेश ,मराठवाडा, विदर्भ , आणि मध्यप्रदेशातून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सामील झालेले आहेत.