पुणे: खराडीत दहशत माजवण्यासाठी मित्रावर प्राणघातक हल्ला, वाहनाचीही तोडफोड Attack on friend in Kharadi
पुणे: शहरातील खराडी भागात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी वाहनाची तोडफोड करून एका तरुणाला गंभीर जखमी केले असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हा प्रकार दि. २५/०८/२०२५ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास खराडी येथील रिलायन्स मार्टसमोर घडला. फिर्यादी आपल्या मित्रासोबत बोलत उभे असताना, दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ येऊन हातातील हत्याराने फिर्यादीच्या गाडीची काच फोडली.
यानंतर आरोपींनी कोणतीही पूर्ववैमनस्य नसताना फिर्यादीच्या मित्रावर त्याच हत्याराने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. आरोपींनी त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, त्यांच्या कृत्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक साहेब पोटे या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशा घटनांमधील आरोपींविषयी कोणालाही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.