Alandi Municipal Council: आळंदीत भाजपचा झेंडा फडकला! २८८ पैकी २१४ जागांवर महायुतीचा 'महाविजय'; महेश लांडगेंनी मानले मतदारांचे आभार


पुणे: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ चे निकाल हाती येत असून, भाजपने पुणे जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आहे. तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदी नगरपरिषदेत भाजपने एकहाती सत्ता मिळवत 'महाविजय' संपादन केला आहे. या विजयाची माहिती उत्तर पुणे जिल्हा निवडणूक प्रमुख आणि भाजपचे ज्येष्ठ नेते महेश लांडगे यांनी दिली.Alandi Municipal Council


राज्यात महायुतीची लाट: महेश लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ आळंदीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे. राज्यातील २८८ नगरपरिषदांपैकी तब्बल २१४ हून अधिक ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळाल्याचे लांडगे यांनी स्पष्ट केले.


उत्तर पुण्यात लांडगेंची रणनीती यशस्वी: पक्षाने महेश लांडगे यांच्याकडे उत्तर पुणे जिल्ह्याची निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्याचे या निकालांवरून दिसून येत आहे. पक्ष संघटन, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकजूट, तसेच विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली गेल्यामुळे हा विजय सोपा झाला, असे लांडगे यांनी म्हटले आहे.

Alandi Municipal Council

माऊलींच्या चरणी विजय समर्पित: विजयानंतर भावना व्यक्त करताना महेश लांडगे म्हणाले, "संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पुण्यभूमी असलेल्या श्री क्षेत्र आळंदीतील हा महाविजय मी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ज्या मतदारांनी पक्षाच्या ध्येय-धोरणांवर विश्वास ठेवला, त्यांना समर्पित करतो."Alandi Municipal Council


'सबल भारत, सक्षम महाराष्ट्र अन्‌ समृद्ध पुणे जिल्हा' अशी घोषणा देत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आहे. आळंदीतील या विजयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

Previous Post Next Post